लहान वयात कमी वेळात मुख पठणाचा केला जागतिक विक्रम,
इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अर्जून शंतनु दाभाडे नावाची केली नोंद
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : धन्य ती माऊली जिने जन्म देऊन दिला हा संस्कार, भगवतगीतेच्या अध्याय ११ मधील भक्तीयोगाचे संस्कृतमधील २० श्लोक केवळ ५ मिनीट ५६ सेकंदात अर्जून शंतनु दाभाडे या अवघ्या ३ वर्ष ११ महिन्याच्या बालकाने तोंडपाठ उत्तम उच्चारण व उत्तम सादरीकरण प्रस्तूत केले. एवढ्या लहान वयात व इतक्या कमी वेळात मुख पठणाचा जागतिक विक्रम केल्याबाबत इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली.
याबद्दल संस्कार भारती भंडाराच्या वतीने अर्जून दाभाडे या बालकाचा सत्कार करण्यात आला. अर्जुन हा नरेंद्र नगर नागपूर येथील रहिवासी असून भंडारा येथील वसंत व विणा कुर्वे तसेच चंद्रपूर येथील अनिल व नंदा दाभाडे चंद्रपूर यांचा नातू आहे. संस्कार भारतीच्या वतीने सार्वजानिक वाचनालय भंडाराच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, कार्यवाह डॉ. जयवंत आठवले, वर्ड रेकॉर्ड रामदास शहारे, डॉ. प्रकाश मालगावे, भारतीचे दत्ता दाढी, मोहन भाकरे, मोहन अग्रवाल मंचकावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अर्जुनचा सत्कार करण्यात आला. तसेच शास्त्रीनगर येथील चिंतामणी गणेश मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमातही रामविलास सारडा, राजेश ठकरार, राजू शादीजा, विनय सोलंकी व इतर मंडळीच्या उपस्थितीत अर्जुनचा सत्कार करण्यात आला. तर शितला माता मंदिर भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात भंडाराचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी, सुमंत देशपांडे, ईश्वरलाल काबरा, डॉ. नरेंद्र व्यवहारे यांनी अर्जुनचा गौरव करून त्याला पुढील आयुष्याकरिता शुभाशिर्वाद दिला.


0 टिप्पण्या