पशुपालकाचे ९६ हजार रुपयाचे नुकसान
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- राहते घरालगत सिमेंट विटाच्या खोलीतून सूना मौका पाहून शेळ्या असलेल्या बंद खोलीचा कोणीतरी अज्ञात इसमाने ताला तोडून लहान मोठ्या १९ शेळ्या किंमत ९६ हजार रुपये चोरून नेल्याची घटना केसलवाडा/ वाघ येथे रविवारी( ता १६) सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पशुपालक यमु धर्मा वाघाये यांचे फिर्यादिवरून लाखनी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
पशुपालक यमू धर्मा वाघाये राहणार केसलवाडा/ वाघ यांचेकडे ११ मोठ्या शेळ्या , ३ मोठे बकरे व ३२ पाटरू अश्या एकूण ४६ लहान मोठ्या शेळ्या आहेत . त्यांचे पती धर्मा वाघाये हे शेळ्यांची राखण करतात . शनिवारी सायंकाळचे सुमारास शेळ्या चारून आणून घरालागत असलेल्या सिमेंट विटाचे घरात बांधून कुटुंबीय रात्री जेवण करून झोपी गेले . रविवारी सकाळी ५ वाजताचे सुमारास झोपेतून उठून शेळ्या असलेल्या खोलीकडे गेले असता ताला तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने घरी येऊन शेळ्या चोरी झाल्याची माहिती दिली व कुटुंबीयांसह शेळ्या ठेवलेल्या खोलीत गेले असता १० लहान मोठ्या शेळ्या एकूण किंमत ६० हजार व ९ पाटरु किंमत ३६ हजर अश्या एकूण १९ शेळ्या पाटर किंमत ९६ हजार रुपये चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने रात्रीचे सुमारास सूना मोका पाहून शेळ्या असलेल्या बंद खोलीचा कुलूप तोडून चोरून नेल्याचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २८१/२०२३. अन्वये गुन्हा दाखल केला. कलम ३८० भादवी अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक आशिष चीलांगे तपास करीत आहेत . वृत्त लिहीपर्यंत चोराचा शोध लागला नसल्यामुळे अटक केली गेली नाही.


0 टिप्पण्या