सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जामखेड तालुका यांच्या वतीने एस टी डेपो चे मॅनेजर शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
साकत कडभनवाडी पिंपळवाडी कोल्हेवाडी - - सावरगांव - धोत्री या गावातील भरपूर विद्यार्थी हे जामखेड याठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांना जामखेड याठिकाणी येण्या-जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहनाचा प्रवास विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीना हा धोक्याचा ठरत आहे.तरी साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, सावरगांव, धोत्री याठिकाणी एस.टी. बस थांबा सुरू करा. मे.साहेबांनी जामखेड ते साकत एस.टी. सेवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत सुरू करावी जेणे करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. ही नम्र विनंती. बस सेवा सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी जामखेड आगाराची राहील.
(तालुकाध्यक्ष),पै.हवा (दादा) सरनोबत (युवा नेते),सनी सदाफुले (ता. उपाध्यक्ष),बालाजी भोसले (शहराध्यक्ष),अनिल पाटील (शहर उपाध्यक्ष), आकाश साठे,बालु मराळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या