Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.प्रा.शा. ७४ जळगाव शाळेच्या वतीने सर्व नवनियुक्त शिक्षक पतसंस्था संचालकांचा सत्कार,

औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी गौतम सौनवणे.
मो.8308128457,


पठैन -: नुकत्याच झालेल्या पैठण तालुका शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व १५ संचालकांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथामिक शाळा ७४ जळगाव शाळेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय राम पाटील एरंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब एरंडे, गावचे उपसरपंच नितीनराव एरंडे, ढोरकीन केंद्र शाळेचे मुख्याध्यापक दत्तूकाका मालकर, केंद्रप्रमुख संतोष पवार सर, शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन आदरणीय शिवाजीदादा एरंडे सर,शिक्षक सेनेचे ज्येष्ठ नेते संतोष केकते सर, ज्येष्ठ मार्गदर्शक साईनाथ चवळी सर, कैलास ढोले सर, भागचंद धायगुडे सर, यांच्यासंह गावातील नारायण देवा सोनवणे, दत्तू अण्णा सुकरे, बाबासाहेब मुळे, उद्धवदादा एरंडे, ग्रामपंचायत सदस्य , विविध सहकारी सोसायटी संचालक, ग्रामस्थ, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल श्री. राम पाटील एरंडे यांचा व राष्ट्रपती पदक मिळवल्याबद्दल श्री. भाऊसाहेब एरंडे(API गुप्तवार्ता विभाग) यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक श्री. अमोल एरंडे, महेश लबडे, राम तांगडे, कैलास मिसाळ, प्रवीण वाघमोडे, पांडुरंग गोर्डे, अमोल शेळके, आबासाहेब टकले, गणपत मिटकर, गजानन नेहाले, श्रीकांत कराड, शमीम पठाण, युनूस शेख आदी संचालक यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या आर्थिक उन्नतीचे सत्कार्य करण्यासाठी निघालेल्या या टीमचा विकासाच्या वाटेवर चालतांना होत असलेला सत्कार अधिक ऊर्जा देणारा असल्याचे मत सर्वांचे लाडके नेतृत्व अमोलराजे एरंडे यांनी व्यक्त करून शाळेचे मुख्याध्यापक अशोक भाग्यवंत सर,जेष्ठ शिक्षक महादेव काटे सर ,मांगीलाल खरात सर तसेच ज्येष्ठ भगिनी रजिया शेख मॅडम व कविताताई दहिफळे मॅडम ,अनिता काकडे-एरंडे यांचे सर्वांचे पतसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू एरंडे, सोसायटी व्हॉइस चेअरमन हरिभाऊ घेगडे, ग्राम पंचायत सदस्य रामभाऊ मतकर, सदस्य बाळासाहेब मुळे, सदस्य विक्रम एरंडे, बिहारिलाल पाठे, भागचंद मतकर, संतोष मुळे, सुनील एरंडे, संजय एरंडे, माजी अध्यक्ष गणेश मुळे, कृष्णा नारळकर, ज्ञानेश्वर नरवडे, गणेश मतकर, भाऊसाहेब जगधने आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या