जळगाव जागृत जनमंच
(रायसोनी नगर)
ही संघटना रजिस्टर नाही.राजकिय नाही.आर्थिक नाही.त्यामुळे सरकारी नोकर व इतर पक्षांतील लोकांना अडचण येत नाही.पैसा अडका वगैरे संबंध नसल्याने कोणालाही वसुली करणे,आक्षेप घेणे, चौकशी करणे, संशय घेणे, अपहार होणे ,ही बाधा होत नाही.आपले आपसातील नाते दुषित होत नाही.
पद आणि अधिकाराचे स्तोम नसल्याने लहान मोठा भेदभाव होत नाही.दुसऱ्याला जबाबदारी शिकवण्याची गरज पडत नाही.ज्याला आवडले त्यांनी स्वेच्छेने,सोयीने सहभागी होता येते.नाही जमले तर ती त्यांची इच्छा.
आम्ही आपसात नैतिक दृष्टीने एकत्रित येतो.आमची सार्वजनिक समस्यासाठी काम करतो.त्यामुळे आपुलकी,भाईचारा टिकून राहिल.
जळगाव जागृत जनमंच हे नैतिक व्यासपीठ आहे.पक्षविरहित, पदविरहित,पैसा विरहित.या निरपेक्ष भावनेने जो येतो तो खूप मोठ्या मानसिक तयारी ने येतो.आपले निहीत स्वार्थ आपल्या कष्टांशी निगडित असावेत.आपला निस्वार्थ हा सार्वजनिक हिताशी निगडित असावा.या हेतूने आपला मित्र,साथी, सहयोगी झालेला माणूस भाग्यवंत असतो.आपण त्यांचे मित्र असणे, जास्त भाग्य असते.
आम्ही सुसंस्कृत, उच्चशिक्षित माणसे आहोत.पण चोर,लबाड, गुन्हेगार लोकांशी आम्ही कडक,भडक भाषेत बोलतो.कारण तो सभ्य नसतो,सभ्यता मानत नाही,सभ्यतेला जुमानत नाही.
मी जर बैलाला चारा,ढेप खाऊ घातली.सांगितले की,शेतात जा.मी येतो.औत चालवायचे आहे.तर तो बैल स्वतः शेतात जाईल का? त्यासाठी त्याला नाकात वेसण घालून दोर बांधून चाबूक,काठी मारून शेतात न्यावे लागते.पण शेतात खोंडे असेल तर दोर तोडून शेतात जाईल.
असेच आपले नगरसेवक आहेत.त्यांना आपण मत देऊन समर्थन दिले.निवडून दिले.कशासाठी?की ,हा रस्ता बनवेल.हा गटार बनवेल.हा सफाई कडे लक्ष देईल.पण तो जर खोटे बोलून वेळ मारून नेत असेल तर त्याचा पाया पडावा कि पायतण हाणावे?हे नागरिकांनी ठरवले पाहिजे.मी नगरसेवकांना खडक,भडक का बोलतो?ती परिस्थिती,ती अवस्था या नगरसेवकांंनी निर्माण केली आहे.ते जर मतदारांशी प्रामाणिक असते तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन नमस्कार केला असता.पण ती त्यांची गुणवत्ता नाही,पात्रता नाही, मानसिकता नाही.म्हणून पुढील निवडणुकीत यांची हकालपट्टी करुन नव्या दमाचे, ओळखीचे चांगले माणसे नगरसेवक निवडून आणणार आहोत.यास्तव आमचे जळगाव शहरातील सर्व भागात,प्रभागात अभियान सुरू आहे.लोक हो!जागे व्हा.तुमचा कराचा पैसा नगरसेवक फस्त करीत आहेत.म्हणून रस्ता गटार बनवत नाहीत.
कालच एका महिला नगरसेवकांच्या पतीने महानगरपालिकेची चांगली पुस्तके, रजिस्टर, रेकॉर्ड रद्दी विकून चार लाख कमवून घेतले.आयुक्त म्हणतात, मला माहित नाही.नगरसेवक म्हणतात,मला माहित नाही.अरे मुर्खांनो,आता तरी माहिती झाले ना!तर मग, कारवाई करा.का करीत नाहीत?कारण या रद्दी विकण्याच्या धंद्यात आयुक्त, उपायुक्त, नगरसेवक सहभागी आहेत.नसते तर यांना राग आला असता.म्हटले असते,
" हमारे होते हुए,ये बदमाषी? हम तो इस से भी जादा बदमाष है.और हमीको उल्लू बनाया? "
यांनी त्या रद्दी विकणाऱ्या चव्हाण ला बोलवून विचारले असते,
"अरे हो सांभा,कितना पैसा मिला रे? जो मिला वो तेरे अकलेके बाप का है क्या?
अरे वो, काशीराम,उठा बंदूक और लगाव निशाणा !
ह्यां ~ ह्यां ~ ह्यां!मर गया साला.हमारा इन्साफ कहता है,बेईमानोकी सजा मौत है.
अरे वो काल्या, लगाव चुना और रगड अच्छी तरह."
अशा चोरांना असेच रखडण्याची गरज आहे.अशा नगरसेवकांना असेच चुना लावण्याची गरज आहे.
"जलगांवका अगला चुनाव कब है?"
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या