• धान उत्पादक शेतकरी सुखावला
• जोमात रोवणी सुरू
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- तालुक्यात १ जून ते ३० जुलै या कालावधीत ३९१ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मागील खरीप हंगामात याच कालावधीत ४४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर खरीप हंगाम २०२३ मध्ये याच कालावधीत ३८०.६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी टक्केवारी ९७.३० टक्के आहे. नियमित पावसाने धान उत्पादक शेतकरी सुखावला असून जोमात रोवणी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार २०७.७८ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२३ मध्ये २१ हजार १४५.५५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. तालुक्याचे १ जून ते ३० जुलै पर्यंत सरासरी पर्जन्यमान ३९१.२० मिलिमीटर आहे. रोहिणी नक्षत्रापासून पावसाची सुरुवात होत असते. चालू खरीप हंगामात रोहिणी व मृग कोरडा गेला. तर आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे मुदतीत पेरणी आटोपली. त्यानंतर आठवडाभर पावसाने दडी मारली. आद्रा, पुनर्वसु व पुष्य नक्षत्रात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे रोवणी सुरू आहे. तालुक्यात लाखनी, पिंपळगाव, पोहरा, पालांदूर व मुरमाडी/तूप. अशी ५ महसूल मंडळ आहेत. १ जून ते ३० जुलै या कालावधीत लाखनी २८६.६० मिलिमीटर, पोहरा ४१५ मिलिमीटर, पालांदूर/चौरास ३५२.६० मिलिमीटर तर पिंपळगाव/सडक २५७.८० मिलिमीटर, मुरमाडी/तूप. ५९०.९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ३८०.६० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ९७.३० टक्के पाऊस झाला आहे.


0 टिप्पण्या