Ticker

6/recent/ticker-posts

त्या" युवकांचे कुटुंबास शासनाने मदत करावी• माजी जि.प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- गडपेंढरी येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णुदास गायधने यांचे मालकीचे शेत जमिनीत रोवणीसाठी जातांना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने दयाराम चोलीरम भोपे(३५) व मंगेश जयपाल गोंधळे(२६) दोघेही रा. मेंढा/भूगाव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्याने त्यांचे कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे. 
              जिल्ह्यात सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू असून मजुरांची संख्या कमी असल्यामुळे इकडून तिकडून मजुरांची व्यवस्था करून हुंडा पद्धतीने रोवणीचे काम पूर्ण करावे लागते. विष्णुदास गायधने यांनी मेंढा/भूगाव येथील १६ महिला व १० पुरुष यांचे मार्फत हूंड्याने रोवणी करण्याचे कंत्राट मुकादम नरेश गजबे याला दिले होते. २५ जुलै रोजी काही शेती रोवून उर्वरीत शेती २७ जुलै रोजी रोवणी करिता सकाळी ७:३० वाजता दरम्यान मजूर शेतात आले व रोवणीसाठी बांधीत उतरत असताना दयाराम भोपे व मंगेश गोंधळे तोल जाऊन धुऱ्यालगत असलेल्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दयाराम भोपे हे विवाहित असून मंगेश गोंधळे हा अविवाहित होता पण त्यांचे कुटुंबाची जबाबदारी त्याचेवर होती. कुटुंबातील कमावत्या पुरुषाच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने त्यांचे कुटुंबास आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या