भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सेंदूरवाफा शहर येथील रहिवासी बिसन झोडे यांची मुलगी व मुळ कोसमतोंडी निवासी तथा काशीवार परिवाराची सून शालू विजय प्रल्हाद काशीवार वय ४३ वर्षे यांचे १३ जुलै रोजी पहाटे ४.०० वाजताच्या सुमारास हृदयविकाराने अकस्मात निधन झाले. अल्पवयात अचानक झालेल्या मृत्युमुळे कुटुंब तीव्र दुःखात असताना सुध्दा नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
त्यांचे पती विजय, मुलगा वेदांत, मुलगी रुची, वडील बिसन झोडे व कुटुंबियांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेऊन भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्रपेढीच्या चमुला बोलवून नेत्रदान केले.
उपजिल्हा रुग्णालय साकोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरंग सुपेकर व सोनाली लांबट, डॉ. ऊषा डोंगरवार, रवींद्र काशीवार व संजय काशीवार यांनी आवश्यक कार्यवाही पुर्ण केली. डॉ. सुमेध काशीवार, राजु काशीवार, दामोदर काशीवार व परिवारातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. नेत्रदानानंतर कोसमतोंडी स्मशानभूमित पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आला. काशीवार परिवाराचे हे सहावे नेत्रदान होते. नेत्रदान हा एक महान दान आहे. या नेत्रदानाने दुसरे कुनीतरी जग बघु शकेल असे महान विचार ठेऊन नेत्रदान केले. असे कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी सांगितले.


0 टिप्पण्या