Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवार यांचे विचार शेवटच्या घटकंपर्यंत पोहचविण्याचे कार्य करून पक्ष संघटना मजबुत करू- माजी आमदार दीनानाथ पडोळे


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847 

भंडारा :- गेल्या 2 जुलै 2023 ला महाराष्ट्रात राजकिय भूकंप होत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार सोबत काही आमदार फुटून दुसरा गट सत्तेवर गेला. त्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस ही कुणाची ? यावर अनेक कार्यकर्ते संभ्रमात पडले. त्यानुसार काल दिनांक 30 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांवर विश्वास ठेवून जुन्याच पक्ष्यांच्या धोरणावर कार्य करण्यासाठी अनेक युवक जिल्हा बैठकीत उपस्थित होते. 
राष्ट्रवादीचे पर्यवेक्षक माजी आमदार दीनानाथ पडोळे, दिलीप पणकुले ,कृष्णकांत मोहड यांनी जिल्हा बैठकित मार्गदर्शन केले. त्यांनी बेठकीत युवकांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करू अशी आमदार दीनानाथ पडोळे यांनी संबोधन केले. चिन्ह,व पक्ष हा आपल्या शरद पवार यांच्या कडेच राहणार असल्याने कुणीही शंका कुशंका ठेवू नये. व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सोबत युवकांना सोबत घेऊन काम करून, असे देखील त्यांनी सभेत ग्वाही दिली.
येत्या निवडणूक मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व शरद पवार यांचे विचार गावोगावी पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढे येणाची गरज आहे. असेआपल्या मार्गदर्शना मध्ये दिलीप पणकुले, यांनी सांगितले, किरण अतकरी यांनी शरद पवार यांचे शेतकरी यांच्या दूरदृष्टी मुळे आजही अनेक फायदे होत आहेत. म्हणून शेतकरी याचे खरे चिंता करणारे नेते हे शरद पवार आहेत. यांच्याच मार्गदर्शनात पुढे आम्ही पक्ष पुढे घेऊन जाण्याचे निश्चित केला आहे. " गेले ते कावळे ' राहिले ते मावळे " या म्हणी प्रमाणे फायद्या साठी मागे मागे धावणारे निघून गेले. आत्ता जे शिल्लक आहे ते खरे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत.
राष्ट्रवादी च्या बेठकीत अनेक महत्त्वाच्या बाबी घेऊन पुढे गेले यात सर्व प्रथम किरण अतकरी यांना जिल्हा अध्यक्ष नियुक्ती करण्याचे ठराव सर्वानुमते पारित केले. जिल्हा कार्यालय तयार करण्याचे देखील यात ठराव घेण्यात आला.
या बैठकी पूर्वी सहकार महर्षी यादवराव पडोळे, व माजी आमदार ईश्वरदायाल पटले यांच्या तेलचित्राला माल्यार्पण करून बैठकिला सुरुवात करण्यात आले. यात वरील संपूर्ण कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या