Ticker

6/recent/ticker-posts



प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9734486558

   (गोंदिया) राज्यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या प्रमुख भुमिकेत असलेले खासदार प्रफुल पटेल है सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता तुमसर तालुक्यातील चांदपुर देवस्थान येथे दर्शनासाठी आलेले प्रफुल पटेल यांना राज्यपाल नियुक्ति आमदारांमध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांची नियुक्ति करण्यात यावी यासाठी खासदार प्रफुल पटेलांना निवेदन देण्यात आले .विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा झालेला आहे. यासाठी नव्याने तयार झालेल्या महायुती सरकारमधील नावांची चर्चा सुरु झाली आहे. भाजप 6 शिंदे व अजित पवार यांच्या गटाला प्रत्येकी 3 आमदार निवडीचे सुत्र ठरले आहे. यात आपले विश्वासु व सर्व कार्यकर्त्त्यांना व जनतेला सोबत घेऊन काम करणारे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे राष्टवादी कांग्रेसचे सर्वांचे लाडके नेते माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांची नियुक्ति करण्यात यावी. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांच्या रुपाने संधी मिळणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरात सुरु आहे. जिथे खासदार प्रफुल्ल पटेल तिथे आम्ही अशी भुमीका कार्यकर्त्यांनी व माननीय माजी आमदार राजेंद्र जैन यांनी घेतली व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पाठिशी उभे राहत दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसला अधिक बळकट करण्याचे काम मागील 40 वर्षांपासुन माजी आमदार राजेंद्र जैन साहेब राजकरणात सक्रिय असून आपल्यासह काम करित आहेत. आपले विश्वासु अशी त्यांची ओळख आहे. तर सहकार क्षेत्रावर सुद्धा त्यांची पकड़ मजबूत असून मागील 20 वर्षांपासुन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर राज्य बॅंकेचे सदस्य म्हणून सुद्धा माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांनी काम केले आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची बांधणी करण्यात व पदाधिकारी, कर्यकरत्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांची भुमिका मह्त्वपूर्ण राहीली आहे. सहकार, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांचा चांगला अनुभव लक्षात घेता आपण माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांची राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये नियुक्त करुण विधानपरिषदेवर पाठविण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे. तरि पण आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्यपाल नियुक्ति आमदारांमध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांची नियुक्ति करावी असे निवेदन खासदार प्रफुल पटेलांना देण्यात आले यावेळी
राजेशकुमार तायवाडे पत्रकार,आरिफ़, रफिक पठाण, पठाण, पोर्णिमा तायवाडे, दिलिप देशमुख, बाला बिरणवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या