Ticker

6/recent/ticker-posts

खोडकिड्याची औषध फवारतांना बापलेकास विषबाधा

• मेंढा/भूगाव येथील घटना 

• प्रकृती धोक्याबाहेर

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- रोवणीनंतर धानावर खोडकिड्याची लागण झाल्याचे समजताच औषध फवारणीसाठी गेलेल्या बापलेकास विषबाधा झाल्याची घटना मेंढा/भूगाव, तालुका लाखनी येथे सोमवारी(ता.२४) दुपारचे सुमारास उघडकीस आली.  ताराचंद यादोराव चुटे(५५) , महेश ताराचंद चूटे(३०),  दुर्गेश ताराचंद चूटे(२६) अशी विषबाधित बापलेकांची नावे आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. 
           ताराचंद चुटे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचेकडे १.२० हेक्टर आर शेतजमीन असून त्यांनी खरीप हंगाम २०२३ मध्ये धानाची लागवड केली आहे. सिंचनाची सोय असल्यामुळे लवकरच रोवणी झाली व धान फुटव्याचे स्थितीत आहे. अचानक त्यांनी धानाची पाहणी केली असता खोडकिड्याची लागण झाल्याचे दिसून आले. हातची फसल जाऊ नये. या करिता त्यांनी रासायनिक खतामध्ये खोडकिड्याचे लिक्वीड मिसळून २ मुलांसह शेतात धानावर फवारणी करीत असताना अचानक मळमळ वाटू लागल्याचे दिसून आल्याने कुटुंबीयांनी गावातच प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लाखनी च्या एका खासगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले. त्यांचेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कीटकनाशक अथवा विषारी औषध फवारणी करतांना सुरक्षा उपकरणांचा अवलंब केला नसल्यामुळे या बापलेकांना विषबाधा झाल्याच्या गावात चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या