Ticker

6/recent/ticker-posts

गोंदिया जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरले अर्जुनी/ मोरगाव

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच मध्ये अर्जुनी /मोरगाव पोलीस ठाणे

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

गोंदिया : ( दिनांक ७ २०२३ ) सन २०१६ मध्ये झालेल्या DGsP / IGsP कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची (Best Police Station) म्हणून निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे ठरले आहे.
सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी / अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सन २०२० या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलीस ठाण्यांची निवड करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येते.
त्याच धर्तीवर सन- २०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरीता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली इ. बाबी बारकाईने विचारात घेवून घटकातील सर्व पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन करून त्यापैकी २ उत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, तसेच परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक / "पोलीस आयुक्त यांनी घटक निहाय / परिमंडळ निहाय प्राप्त प्रत्येकी २ पोलीस ठाण्यांमधून परिक्षेत्र / आयुक्तालय स्तरावर उत्कृष्ट २ पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीय स्तरावर समिती, आणि परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्तः उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून ५ सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती इ. समित्या गठीत करण्यात आल्या होत्या."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या