Ticker

6/recent/ticker-posts

वृक्षारोपण ही काळाची गरज - गट शिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई.... 
पाणी अडवा पाणी जिरवा, जीवनबागेत हिरवळ फुलवा... 
असे सुंदर सुंदर घोषवाक्य निसर्ग आणि झाडांवर तयार केले आहेत. कारणही तसंच आहे. आपल्याला जिवंत राहण्यासाठी आॅक्सीजनची आवश्यकता असते. आणि ती आवश्यकता निसर्ग झाडे पुर्ण करत असतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे. झाडे आणि वनस्पतींच्या माध्यमातून निसर्ग सर्व सजीवांवर अनंत उपकार करतो.  झाडे देखील आपल्या पर्यावरणाचे रक्षण करतात, म्हणून आपण झाडे तोडू नये. आज आपण आपल्या लोभापोटी झाडे तोडून आपल्या पर्यावरणाची खूप हानी करत आहोत. त्यामुळे पक्ष्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. आणि पर्यावरणही प्रदूषित होत आहे. पूर, भूस्खलन आदी घटना झाडे तोडल्यामुळे झालेली आपण पाहिले आहे.
म्हणूनच झाडे लावणे आवश्यक आहे. आणि हीच बाब लक्षात घेऊन आणि दिवंगत श्रीमती रत्नमाला रामचंद्र समुद्र बाई (कदम बाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी बोलताना जामखेड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवे साहेब बोलतांना म्हणाले की, पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरीकांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
जामखेड येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे आज रोजी सकाळी ७ वाजता दिवंगत श्रीमती रत्नमाला रामचंद्र समुद्र बाई (कदम बाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 
वृक्षारोपण जामखेड चे गट शिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. 
 यावेळी शिक्षक बँकेचे संचालक श्री संतोष राऊत, विश्वस्त श्री. मुकुंद सातपुते, श्री. भामुद्रे मामा, कुमटकर सर श्री उपेंद्र आढाव सर,मा. मुलाणी सर, मुख्याध्यापक श्री. बडे सर श्री. शिंदे सर, श्री. जोगदंड सर, पालक श्री. दत्ता पवार समस्थ शिक्षकवृंद विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या