जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चौकशी करुन दोषीवर गुन्हा दाखल करा
रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा :-साकोली तालुक्यातील केसलवाडा, सानगडी येथील मंगेश प्रकाश खोब्रागडे यांचे प्रकरण हे आत्महत्येचे नसून मंगेशचा घातपात केला असे कुटूंबियांचे म्हणणे आहे. त्यासाठी सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करुन दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा गावातील नागरिक आंदोलन करतील. याची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागाची राहिल. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंगेश खोब्रागडे हा दि. ७ जून ला रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीच्या फोन आल्याने लगेच घरुन निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. याबाबत पो.स्टे. ला तक्रार दाखल केली. परंतु मंगेशचा पत्ता लागला नाही. दि. ९ जूनला मंगेशचे प्रेतच त्याच्या घरा समोरील विहीरीत पाण्यावर तरंगतांना दिसले. पोलिसांनी प्रेत काढून पंचनामा केला. परंतु या प्रकरणाची साधी चौकशी सुध्दा झाली नाही. त्यामुळे सदर असल्याचे प्रकरण घातपाताचा कुटूंबियांकडून बोलले जात आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी छगन नेवारे, ढोके, बाबुराव फुलके, राजानंद बारसागडे, ज्योती मेश्राम, बाबुराव ढोके, किशोर खोब्रागडे, प्रवीण राऊत, मारोती संग्रामे, योगराज बावणे, लक्ष्मण ठाकरे, जगदिश खोब्रागडे, चुन्नीलाल वासनिक नरेश बेलेकर इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या