Ticker

6/recent/ticker-posts

गायरानधारकांसाठी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- अशोक सोनोने

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


जळगाव - वंचित बहुजन आघाडीतर्फे 20 जुलै रोजी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावावर व्हावे हा मुद्दा असून गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे धारक यांनी मोर्चा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अशोक सोनोने यांनी केले आहे.

 वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थित महाराष्ट्रातील गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे हे संबंधितांच्या नावावर करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभर पक्षातर्फे नियोजनासाठी सभा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच बैठकीचे आयोजन पंचशिल नगर धम्मदिप बौद्ध विहार,भुसावळ येथे दिनांक 8/7/2023 रोजी करण्यात आले. या प्रसंगी गायरान कृति समिती अध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या उपस्थितीत व गायरान कृति समिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीस जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे,माथाडी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,जिल्हा IT प्रमुख सचिन बाऱ्हे,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे,भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे,जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,विद्यासागर खरात,शेख याकुब शेख नजिर,अरूण तायडे,बंटि सोनवणे,रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलिप पोहेकर,जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे,बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम,प्रमोद बाविस्कर,बाळु कोळी(चोपडा),निलेश भालेराव(चोपडा),गौतम लोखंडे,सुनिल ठाकुर,अरुण नरवाडे,महिला आघाडी मुक्ताईनगर तालुकाध्यक्षा संगिता धोबी,विशाखा गौतम,वैशाली राव (भुसावळ),रावेर तालुका महासचिव कांतिलाल गाढे,यावल तालुका महासचिव राजेश गवळी,बोदवड तालुका महासचिव सुभाष इंगळे,निलेश जाधव(भुसावळ),दौलत अढाइंगे(रावेर),लता तायडे,कंदर सिंग बारेला,शंकर लहासे,अक्षय निराले(जामनेर),स्वप्निल सोनवणे,संतोष सुरवाडे(मोढाळा),सुभाष शिंदे,अतुल पाटिल,राहुल मोरे(बोदवड),रुपाली बाऱ्हे(सांगवी),गिता इंगळे(सांगवी),सुरेश कडु अटकाळे(रावेर) सह जिल्हा,तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या