Ticker

6/recent/ticker-posts

साकोली विधानसभा क्षेत्रातील तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी ५ कोटीं ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर

आमदार नानाभाऊ पटोले यांनी खेचून आणला निधी

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्ह्यात साकोली विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामे खेचून आणण्यासाठी सातत्याने नानाभाऊ पटोले प्रयत्नशील असून विकासाच्या क्रमामध्ये साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत राज्य अर्थसंकल्प अंतर्गत सन २०२२ -२३ मध्ये साकोली उपविभागातील तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी ५ कोटीं ७० लक्ष रुपयांचा निधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेला आहे. शासनाच्या राज्य अर्थसंकल्प योजनेअंतर्गत या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या विकास कामांसाठी या क्षेत्राचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली आहे. या विकास कामांमध्ये साकोली तालुक्यातील १२ एकोडी, चांदोरी, परसोडी, उमरी, शेंदूरवाफा मुंडीपार/ सडक, कुंभली ,पळसगाव/सो,सासरा, शिवनीबांध,गोंडउमरी, शिवनीबांध..लाखनी तालुक्यातील १४ लाखनी, पिंपळगाव/सडक,पोहरा,पालांदूर/चौ, मुरमाडी/तु गोडंसावरी,गडेगाव ,केसलवाडा/वाघ मानेगाव,लाखोरी ,सालेभाटा, मोरगाव, पेंढरी,चान्ना,.. लाखांदूर तालुक्यातील १२ विरली/ खुर्द,किरमटी, बेलाटी, सोनेगाव,मांढळ,बारव्हा, तावशी,चिंचाड, पिंपळगाव/को,कन्हाळगाव,मांदेड,करांडला गावांच्या नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आधी असलेले तलाठी कार्यालय हे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे कार्यालयातील दस्तावेज शोधण्यासाठी व त्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांनी नवीन तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी आमदार पटोले यांच्याकडे मागणी केलेली होती. तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारती करिता सातत्याने पाठपुरावा करून आमदार पटोले यांनी ५ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी तलाठी कार्यालयांच्या नवीन इमारती करिता प्रशासकीय मंजुरी सह मिळवून दिलेला आहे. लवकरच तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू होणार असून सदर विकास कामे मंजूर केल्याबद्दल क्षेत्रातील ग्रामस्थांसह राजस्व विभागातील कर्मचाऱ्यांनी आ.पटोले यांचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या