रतन जाधव ग्रामीण बीड (चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.7030271408
बीड : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट या जयंती दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी. अशी मागणी मातंग एकता आंदोलन माढा तालुका अध्यक्ष अनिल गवळी यांनी कुर्डवाडी प्रांत कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी विभाग कुर्डवाडी समाधान घुटूकडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाची अस्मिता असून त्यांचे शिक्षण केवळ दीड दिवसाचे झाले आहे. ते विविध भाषेत ज्ञानीत होते त्यांना जवळपास १८ भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यांना आलेल्या अनुभवातून ते एक उत्कृष्ट कादंबरी व साहित्यिक शाहीर होते. त्यांनी विविध भाषेमध्ये अनेक कादंबरी व साहित्य लिहिले. यांनी कामगाराच्या विविध प्रश्नासाठी प्रशासनाकडे बराच वेळ उठाव करून त्यांना न्याय हक्क मिळवून दिलेला होता. ते कामगार चळवळीचे प्रणेते होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन गौरव सातासमुद्रापार त्यांनी रशियामध्ये पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले होते. त्यांच्या कार्याचा बहुमान म्हणून आज रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबरीवर अनेक चित्रपटाची निर्मिती झाली. अण्णाभाऊंच्या सदरच्या कार्यामुळे उभा महाराष्ट्र लोकशाहीर या नावाने ओळखत होता व आहे. त्यांच्या कार्याची जनसामान्यांना माहिती व्हावी म्हणून १ ऑगस्ट जयंतीचे औचित्य साधून एक दिवस शासकीय सुट्टी मिळावी. त्यांच्या कार्यास समस्त महाराष्ट्रातील मातंग समाजाला पर्वणी ठरून मातंग समाजाला एक प्रकारे न्याय मिळणार असल्याची भूमिका त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष अनिल गवळी युवक आघाडी , तालुकाध्यक्ष रोहित कांबळे , कुर्डूवाडी शहर युवक अध्यक्ष अमन कांबळे ,मा . उपसरपंच कालिदास शिरतोडे ,मनोहर वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या