• लाखनी प्रभाग क्रमांक ८ मधील घटना
• पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :-लाखनी शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील राहत्या घरी २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार(ता.१९) सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाचे नाव चेतन अशोक बांते(२७) रा. लाखनी असे आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मृतक युवक हा ऑटो चालक असून दारू पिण्याचे सवईचा होता. बुधवारी दारू चे नशेत घरातील लाकडी मयालीस दुपट्टयाचे साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे निदर्शनास आल्याने विनोद बांते यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनास्थळ गाठले. कुटुंबीयांचे मदतीने मृतदेह खाली उतरवून घटनास्थळ पंचनामा केला. तथा उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या