• खुर्शीपार येथील घटना
• लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:- जेवण करीत असताना वडीलास केस दिसल्याने सुनेला विचारणा करीत असता मुलाने वडीलाजवळ येऊन शिवीगाळ करून कड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना खुर्शीपार येथे घडली. लाखनी पोलिसांनी मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जखमी वडिलाचे नाव विष्णू बाळू वाघाये(५७) खुर्शीपार तर आरोपी मुलाचे नाव तोशित विष्णू वाघाये(२७) खुर्शीपार, तालुका लाखनी असे आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
वाघाये कुटुंबीय एकत्र वास्तव्यास असून शेतीचे काम करतात. १८ जुलै रोजी रात्रीचे सुमारास वडील विष्णू वाघाये घरी जेवण करीत असताना जेवणात केस सापडल्याने सुनेला तू बरोबर पाहत नाही का. अशी विचारणा करीत असताना आरोपी मुलाने वडीलाजवळ येऊन तू इथे बोलायचे नाही असे म्हणून शिवीगाळ केली वडिलांने हटकले असता मुलाने त्याचे हातातील स्टील चे कड्याने वडीलेचे डोके व कपाळावर करून गंभीर दुखापत केली. आई भांडण सोडवण्यास आली असता तिलाही ढकलढुकल करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याने वडील विष्णू वाघाये याचे फिर्यादीवरून तथा वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २८५/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ भादवी अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने तपास करीत आहेत. पोलिसांकडून आरोपीस अटक करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या