Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद गांधी विद्यालयाची "पीएमश्री" योजनेसाठी निवड

• विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार

• विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा खर्च, दिव्यांगांना शिष्यवृत्ती दिली जाईल 


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा :- लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लाखनी ची "प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया(पीएमश्री)" या योजनेसाठी निवड करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन शिक्षण प्रणालीसह व्यवसायिक अभ्यासक्रमांचे माध्यमातून विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच आपल्या निवासस्थानापासून विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा खर्च व दिव्यांगांना वार्षिक शिष्यवृत्ती ची सोय या पीएमश्री योजनेत करण्यात आली आहे. 
            जिल्हा परिषद गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ५ ते १२ वर्ग असून यात ११०० दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबातील मुले ज्ञानार्जन करतात. या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डब्ल्यू. मेश्राम यांनी वर्षभरापूर्वी प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केल्याची दखल घेऊन या कनिष्ठ महाविद्यालयाची "प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया(पीएमश्री)" या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना असून जिल्हा परिषद भंडारा द्वारा संचालित जि.प. गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्याने ही शाळा तालुक्यात मॉडेल शाळा म्हणून काम करेल. या योजनेतून मुलांना आधुनिक शिक्षण प्रणालीवर भर तसेच स्मार्ट शिक्षणासाठी तसेच नवीन शैक्षणिक धोरणाशी जोडल्या जाईल. या शाळेमध्ये अनुसरलेली शिक्षण प्रणाली अधिक अनुभवात्मक, सर्वांगीण, वास्तविक जीवनातील परिस्थितीवर आधारित असेल. शिक्षणाचा स्तर सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 
              अभ्यासक्रमात जलसंधारन, कचरा पुनर्वापर, ऊर्जा या सारख्या कार्यक्षम पायाभूत सुविधांवर भर, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात नोकरीच्या व उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना टॅब, ई-लायब्ररी उपलब्ध करून दिल्या जातील डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध होतील. संगणक शिक्षण प्रणालीवर भर राहील अद्यावत क्रीडांगण व खेळाचे साहित्य तसेच निष्णात प्रशिक्षक उपलब्ध केल्या जातील. विद्यार्थी, विद्यार्थिनींना आपल्या निवासस्थानापासून येण्याजाण्याचा ६०० रुपये प्रति महिना खर्च दिल्या जाईल. मध्यांन भोजनाची व्यवस्था असेल तसेच अपंग विद्यार्थ्यांना वार्षिक ३ हजार ५०० रुपये प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल. या विविध उपाययोजनामुळे जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय एक आदर्श शाळा बनण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या