Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा दक्षिण उस्मानाबादची जिल्हा बैठक संपन्न, दक्षिण उस्मानाबादेत पंधरा हजार सदस्यांचे लक्ष !


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दि 06 ऑगस्ट 2023 रोजी,उस्मानाबाद जिल्हा दक्षिण चे सर्व जिल्हा,तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्षा विजयमाला सुरेश धावरे यांच्या अध्यक्षतेखाली आनंद बुध्दविहार हडको तुळजापूर येथे संपन्न झाली.
यावेळी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीच्या कामाकाजाला सुरुवात करण्यात आली. या जिल्हा बैठकी मध्ये सदस्य नोंदणी अभियान,सर्वसाधारण सभासद,सक्रिय, सभासद,आजीवन सभासद,समता सैनिक दल शिबिराचे नियोजन करणे,जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे,महिला उपासीका शिबिर लावणे,बौद्धगया पर्यटन,जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याचा मासिक अहवाल यासह अणदूर आणि लोहारा येथील बुद्धविहार निर्मानाच्या अनुषंगाने चर्चा होऊन 03 सप्टेंबर रोजी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर घेणे, दक्षिण उस्मानाबाद जिल्ह्यात दहा हजारा पेक्षा भारतीय बौद्ध महासभेचे सभासद करण्या बरोबरच पाच हजार सक्रिय सदस्य आणि अजीवन सदस्य करणे,यासह गाव तिथे ग्राम शाखा व समता सैनिक निर्माण करायचे सर्वानुमते ठरविण्यात आले.तर जिल्हा बैठकीचा अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्षा धावरे यांनी अवघ्या दोन महिन्यात भर-भरून झालेल्या कामकाजावर समाधान व्यक्त करत म्हणाल्या की, आपण सर्वजण खूप प्रामाणिक पणे काम करत असून,आपण लवकरच दक्षिण उस्मानाबाद जिल्ह्यात गाव तिथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा आणि समता सैनिक उभा करून भारतीय बौद्ध महासभेला गाव स्तरावर घेऊन जाऊ,असे सांगून सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.तसेच यावेळी जि.सरचिटणीस सुकेशन ढेपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या जिल्हा बैठकीचे प्रस्ताविक जि. पर्यटन उपाध्यक्ष विश्वास पांडागळे यांनी केले तर जि. कोषाध्यक्ष राजश्री कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.या जि.बैठकीस महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे,
जि.महिला सचिव कांचन अजय सीतापुरे,समता सैनिक जि.उपाध्यक्ष अनिल विठ्ठल सरतापे,जि. उपाध्यक्ष संस्कार बाळासाहेब बागडे,जि.सचिव संस्कार पांडुरंग ढेपे,जि.महिला सचिव कांचन अजय सीतापूर,जि. संघटक मीनाताई लागडे,जि. हिशोबनीस देविदास कदम जि.विद्यानंद वाघमारे,जि.संघटक विजय बनसोडे,
उस्मानाबाद ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,उस्मानाबाद ता. सरचिटणीस उमाजी गायकवाड,ता. अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे,ता. सरचिटणीस विठ्ठल सुरते,ता.समता सैनिक वैभव सिरसठ यांच्या अनेक कार्यकर्ते व पधादिकाऱ्यांची उपस्थिती होती,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या