Ticker

6/recent/ticker-posts

दत्तक गावात पोलिस अधीक्षकांच्या वाढदिवशी विविध उपक्रम साजरे

• अभ्यासिका केंदाचे उद्घाटन


• पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रक्तदान 


• आरोग्य शिबीर, नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324



भंडारा :- भंडारा पोलिस आदर्श गाव मुरमाडी/सावरी येथे जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून पोलिस ठाणे लाखनी व समर्थ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवारी(ता.२२) समर्थ महाविद्यालय लाखनी येथे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचे हस्ते अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन, आरोग्य शिबीर, नेत्र व दंत तपासणी आणि रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आणि गावकरी व विद्यार्थ्यांचे वतीने पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचा वाढदिवस साजरा करून सन्मानपत्र देण्यात आले. 
              लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीतील मुरमाडी/सावरी पोलिस दत्तक ग्राम तसेच केसलवाडा/वाघ येथे पोलिस, नागरिक व लोक प्रतिनिधींचे पुढाकाराने गावात संपूर्ण दारू बंदी केल्या प्रीत्यर्थ जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे, प्रमुख उपस्थितांमध्ये उपार पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंह, डॉ. अशोक बागुल, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, राष्ट्रीय शिक्षण संस्था अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राध्यापक अजिंक्य भांडारकर, मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी, केसलवाडा/वाघ चे सरपंच स्वप्नील बोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. 
              जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी मुरमाडी/सावरी गावातील ४ अवैध दारू विक्री करणाऱ्यांपैकी एकाला भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करून दिला. अमली पदार्थाचे आहारी गेलेल्या ६० युवकांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त केले. तसेच १६ ज्येष्ठ नागरिक जे एकटे आहेत व स्वतः च्या खानपानाची व्यवस्था करू शकत नाही. त्यांची मागील वर्षभरापासून भोजनाची व्यवस्था केली. ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. तथा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. धनंजय गुरेपुंजे, तर आभार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 
*पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रक्तदान(चौकट)*
आपण समाजाची काही देणे लागतो. ही सामाजिक बांधिलकी जोपासत पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलिस हवालदार सुभाष राठोड, धनराज भालेराव, महिला पोलिस हवालदार वासंती बोरकर, इंद्रायणी येलमुले, पोलिस शिपाई पियूष बाच्छिल यांनी रक्तदान केले. 

सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

सामाजिक कार्यात सतत धडपडणारे तथा लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, सुनील भाग्यवाणी, दिनेश पंचबुद्धे, सूर्यकांत गंभने, क्रांतिज्योती महिला संघटनेच्या अध्यक्ष अश्विनी भीवगडे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या