Ticker

6/recent/ticker-posts

दिघोरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा शांततेत पार पडली


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील दिघोरी/नान्होरी ग्रामपंचायतीची आर्थिक वर्ष २०२३-२४ ची द्वितीय ग्रामसभा मंगळवार(ता.२२) सकाळी ११:३० वाजता सरपंच शरद मार्तंड इटवले यांचे अध्यक्षतेखाली, ग्रामसेवक मंगला येरने, उपसरपंच संध्या कुळमते, ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला खोब्रागडे, नाजूक जांभूळकर, संगीता शेंडे, ग्रामपंचायत सदस्य तुळसीदास हलमारे, धनराज मेश्राम, आशिष खोब्रागडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबुराव लांबकाने, माजी सरपंच पुरुषोत्तम हलमारे, सामाजिक कार्यकर्ता भीमराव देशपांडे, आत्माराम खोब्रागडे, गिरिधारी लांबकाने, सुकराम निरगुळे, आशा सेविका प्रभा कळपते, कृषी सहाय्यक पडोळे, अंगणवाडी सेविका अर्चना हलमारे यांचेसह १२० ग्रामस्थ उपस्थित होते. 
                 मागील सभेचा वृत्तान्त वाचून कायम करणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२४-२५ कामांचे नियोजन तयार करणे, तथा २०२३-२४ चे पूरक नियोजन तयार करणे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चे पुनर्गठन करणे, शासकीय परीपत्रकाचे वाचन करून विकास कामास मंजुरी प्रदान करणे, जनतेकडून आलेले अर्जाचे वाचन करून त्यावर विचार विनिमय करणे इत्यादी विषयावर चर्चा करून खेळीमेळीचे वातावरणात ठरावांना मंजुरी प्रदान करण्यात आली. नवनियुक्त तमुस अध्यक्ष नरेंद्र लांबकाने यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामसभेच्या यशस्वितेसाठी पाणी पुरवठा कर्मचारी राधेश्याम निरगुळे, रोजंदारी कर्मचारी संगम खोब्रागडे, संदीप इटवले यांनी अथक परिश्रम घेतले. 


तमुस अध्यक्ष निवडणुकीने


महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदाकरीता नरेंद्र दुर्योधन लांबकाने, रवींद्र खुशाल उपरिकर, रोहित भागवत लांबकाने ही ३ नावे सुचविण्यात आली. त्यापैकी रवींद्र उपरिकर यांनी नाव मागे घेतले. २ उमेदवार बाकी असल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. त्यात नरेंद्र लांबकाने यांना २८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या