Ticker

6/recent/ticker-posts

जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी भारत जोडोनंतर आता लोकसंवाद पदयात्रा यशस्वी करा : माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण...

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.८८८८११७९७५
नांदेड। भारत जोडो यात्रेचा इफेक्ट कर्नाटकच्या निवडणुकीत दिसून आला देशभरात काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे. वातावरण मतात परिवर्तित व्हावे व पुन्हा देशात इंडिया आघाडी, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे यासाठी विद्यमान सरकारचे सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे असलेले दुर्लक्ष गावा-गावापर्यंत पोहोचवत जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठीच्या लोकसंवाद पदयात्रेचे सूक्ष्म नियोजन करीत यात्रा यशस्वी करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो'च्या धर्तीवर 'महाराष्ट्र जोडो' अभियान राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून राज्यात 'लोकसंवाद पदयात्रा' काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ११) शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल येथे काँग्रेस मराठवाडास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी खा. तुकाराम रेंगे, विधानसभेतील काँग्रेसचे प्रतोद सुरेश वरपुडकर, आ. प्रज्ञा सातव, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. भाऊसाहेब पाटील गोरेगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. सिराज देशमुख, प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रवींद्र दळवी आदींची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले, की भारत जोडो यात्रेचा पक्षाला मोठा फायदा झाला वातावरण निर्मिती झाली हे वातावरण निवडणुकीपर्यंत कायम राहावे व मतात परिवर्तित व्हावे यासाठी जनसंपर्क आणखी वाढविणे तसेच सरकारचे अपयश सामान्यापर्यंत पोहोचविणे व काँग्रेसची भूमिका जनतेपर्यंत मांडणे आवश्यक आहे. यासाठी 3 ते 17 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून 'लोकसंवाद पदयात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेत कॉर्नर बैठका, सभा घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांतून यात्रा जावी यासाठी त्या - त्या जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांनी प्रमुख नेत्यांना विश्वासात घेत यात्रेचा मार्ग निश्चित करावा. सूक्ष्म नियोजन करत यात्रा यशस्वी व्हावी यासाठी सांघिक प्रयत्न करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या