Ticker

6/recent/ticker-posts

एमपीएससी परीक्षेत व्यापम घोटाळा सुरू आहे का?


🔹 आरोग्य संचालक पदाच्या मुलाखती  पॅकेज घेऊन मॅनेज केल्या होत्या??? 

🔹 एकाच कॅडरच्या  उमेद्वारांची निवड  झाल्याची चर्चा. 


चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने  नुकत्याच झालेल्या मुलाखतीच्या  अनुषंगाने  आणि निवड करण्यात आलेल्या  परिक्षार्थिंच्या  यादी वरुन  प्रचंड प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट होते.   आरोग्य संचालक पदाच्या मुलाखती  घेतल्या असल्या तरी  त्यात फार मोठा घोटाळा झाला आहे. अनेकांना  मुलाखती मध्ये एकसारखे 20 मार्क टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या पदाच्या परिक्षा  पुन्हा घेण्यात याव्यात.  तसेच वरिष्ठ पातळीवरुन उचित चौकशी करून  घोटाळा करणाऱ्यांवर   कारवाई करण्यात यावी.  
यापूर्वीही  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षां मधील  अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. काही ठिकाणी परिक्षा व्यवस्था सदोष होती. त्यामुळे मास कॉपीला उत्तेजन मिळाले होते , सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेतील सगळा प्रकार महाराष्ट्रातील 'व्यापमं' आहे असा आरोप केला होता तसेच परीक्षा रद्द करण्याचीही मागणी केली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेच्या एका आठवड्याआधी बैठक क्रमांकासह ओळखपत्र दिली जातात. त्यात बैठक क्रमांक उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे देण्यात येतात. त्यामुळे ओळखीचे उमेदवार एका मागोमाग एक नंबर यावा म्हणून मोबाईल क्रमांक बदलत होते त्यामुळे मास कॉपीचा प्रकार वाढला होता असं विद्यार्थ्यांचा दावा आहे. 4 मिनिटांचा उशीर आणि त्याने जीव दिला होता. MPSC परीक्षेचे उमेदवार एवढे  चिडले आहेत. 
या कथित प्रकाराविषयी माहिती जाणून घेण्याविषयी   परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याशी संपर्क साधला. नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने सांगितलं, "गेल्या एक दोन वर्षांपासून अशा पद्धतीने बैठक व्यवस्था आयोगाने राबवायला सुरुवात केली होती. मात्र तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलं नव्हतं. पण यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्या. या परीक्षेला साधारण दोन लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2300 विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. त्यातील 14 उमेदवार असे होते ज्यांचे बैठक क्रमांक एकामागोमाग एक असे होते. त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर एक दोन परीक्षा झाल्या. तेव्हा मुलांना असं लक्षात आलं की एकामागोमाग एक असे मोबाईल नंबर असतील तर बैठक क्रमांक पण तसे येतात. हे प्रमाण वाढत गेलं. मग महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षेत या पास झालेल्या जोड्यांचं प्रमाण 3000 झाले होते. इतकंच काय तर एकाच खोलीतले सात सात मुलं पास झालीत. तेव्हा हा सगळा प्रकार प्रकर्षाने समोर आला. तेव्हा आयोगाने कबूल केलं की आम्ही मोबाईल क्रमांकानुसार बैठक क्रमांक देत आहोत. पण हे प्रकार घडू नये म्हणून आम्ही दक्षता घेत आहोत."
जेव्हा उमेदवार परीक्षेसाठी नोंदणी करतात तेव्हा त्यांचं एक प्रोफाईल आयोगाच्या वेबसाईटवर तयार होतं. तिथे मोबाईल नंबर बदलण्यासाठी आयोगाला फक्त एक मेल करावा लागतो. त्यानंतर एका दिवसात क्रमांक बदलून मिळतो. असंही या विद्यार्थ्याने  सांगितले.
स्पर्धा परीक्षा ही खरंतर वेळेशीच स्पर्धा असते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परीक्षेसाठी सुरक्षाव्यवस्था कडक असते. परीक्षेच्या वर्गात असणारे पर्यवेक्षक सुद्धा त्याची दक्षता घेताना दिसतात. आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वं पाळणं त्यांना अर्थातच बंधनकारक असतं. प्रश्नपत्रिकेचे A, B, C, D असे संच असतात. प्रत्येकाला वेगळा संच मिळतो. या चारही संचात प्रश्न सारखे असले तरी प्रश्नक्रमांक वेगळा असतो. असं असतानाही एकमेकांना प्रश्न विचारण्याचे हे प्रकार कसे घडतात हा प्रश्न विद्यार्थ्याला विचारला,
त्यावर उत्तर देताना  विद्यार्थी म्हणाला, "हे सगळं प्रकरण फक्त एखादा प्रश्न विचारण्यापुरता मर्यादित नाही. ज्या लोकांनी ठरवून हे प्रकार केले आहेत ते लोक अगदी विषय सुद्धा बदलून घेतात. म्हणजे एखादा उमेदवार एका विषयाचा अभ्यास करणार, तर दुसरा उमेदवार दुसरा एखादा अभ्यास करणार असं ठरलेलं असतं. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी ज्या उमेदवाराने ज्या विषयाचा अभ्यास केला आहे त्याचे प्रश्न सोडवतो. बाकीचा पेपर सोडवून झाले की मग उत्तरं विचारायचे आणि आपण ज्या विषयाचा अभ्यास केला त्या प्रश्नांचे उत्तर सांगायचे अशी ही पद्धत असते. परीक्षेत वेळ तसा कमी नसतो. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पर्यवेक्षक हजेरीच्या कागदावर सही करणं वगैरे औपचारिकता पूर्ण करत असतो तेव्हाही थोडा वेळ मिळतो. तेव्हा हे सगळे प्रकार घडतात."
राज्यसेवा पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान आणि CSAT (Civil Services Aptitude Test) असे दोन पेपर असतात. त्यापैकी CSAT ही बुद्धीकल चाचणी असते तिथेही काही भाग एकाने सोडवायचा, काही भाग दुसऱ्याने सांगायचा असे प्रकार घडतात. या दोन पेपरच्या मध्ये दोन तासांचा ब्रेक असतो. तेवढ्या वेळात पुढे मागे बसलेल्या उमेदवाराची ओळख करून घेऊन हा एक्सचेंजचा प्रकार चालतो असा दावा  विद्यार्थ्याने केला आहे.
या बैठकव्यवस्थेची पद्धत बदलून द्या अशी मागणी उमेदवारांनी आयोगाकडे केली होती मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.या संदर्भात" मुख्यमंत्र्यांनाही मेल केलेत, मात्र तिथूनही काहीही प्रतिसाद मिळालेला नाही." असंही या उमेदवाराने सांगितलं.
या आरोपांविषयी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत. ते म्हणाले, "मुळात संचच वेगळे असल्यामुळे हे गैरप्रकार होऊ शकत नाही.  बैठक व्यवस्था ठरविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रत्येक परीक्षेसाठी ती पद्धत वेगवेगळी असते. अर्जाच्या अंतिम स्वीकृतीच्या दिनांकानंतर ती बदलत असते. या पद्धती गुप्त असतात. तरीही  दक्षता घेतली जाते. गेल्या चार वर्षांपासून मोबाईल क्रमांकानुसार बैठक व्यवस्था राबवण्याची पद्धत अस्तित्वात आहे. या आरोपांवर आम्ही कारवाई केली आहे मात्र आम्हांलाही काही बाबतीत गुप्तता बाळगावी लागते त्यामुळे त्या आम्ही सांगू शकत नाही असेही सांगितले. यापुर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2018 मध्ये परिक्षेत डमी विद्यार्थी बसवून 400 हुन अधिक विद्यार्थी  उत्तीर्ण करण्यात आले होते. शिक्षक पात्रता परीक्षेतही  (टिईटी) 7800 उमेदवार बोगस  पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पात्र ठरविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर आरोग्य विभागाच्या प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका ही व्हाट्सअपवर  फोडण्यात आल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या