• मुंडीपार/सडक येथील घटना
• लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- लाखनी येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील मुंडीपार/सडक येथे घरासमोरील अंगणात खुंटाला बांधलेल्या ६ म्हशीपैकी ३ म्हशी मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना मंगळवारी(ता.२२) पहाटे उघडकीस आली. १ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी घनश्याम लांडगे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
धान शेती परवडेनासी झाल्याने अनेक शेतकरी पाळीव जनावरांचे पालन पोषण करून दुग्ध व्यवसायाकडे वळलेले आहेत. घनश्याम लांडगे(५२) मुंडीपार/सडक यांचेकडे ६ वेगवेगळ्या जातीच्या म्हशी व १ मुर्रा जातीचा हल्ल्या होता. दररोज सकाळी शेतीच्या आजूबाजूला व जंगल शिवारात ते स्वतः म्हशी चारण्यासाठी नेत असत. सोमवारी नेहमी प्रमाणे म्हशी चारायला नेऊन सायंकाळी घरी आणून घरासमोरील अंगणात खुंटाला बांधून चारापाणी केला. रात्री १०:०० वाजताच्या सुमारास जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री दरम्यान जाग आल्याने लघुशंकेसाठी उठले असता सर्व जनावरे बांधलेली दिसली. त्यांना चारा टाकून पुन्हा झोपी गले. त्यानंतर पहाटे ४:०० वाजता दरम्यान झोपून उठलो व शेन उचलण्यासाठी म्हाशीकडे गेलो असता ३ म्हशी दिसून आल्या नाही. त्यांचा शोध घेतला. पण मिळून आल्या नाही. चोरी गेलेल्या ३ म्हशींची किंमत १ लाख २० हजार रुपये असून कोणीतरी अज्ञात चोराने सूना मोका पाहून चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३१७/२०२३ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या