जळगाव शहरातील रस्ते बनवण्याची लायकी ना आमदारांची,ना नगरसेवकांची.म्हणून एड संजय सिंग पाटील म्हणाले की,येथे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच आले पाहिजे.त्यांनीच हे रस्ते बनवून परत दिल्लीत गेले पाहिजे.येथले आमदार दारू विकून पोट भरतात.नगरसेवक इकडून तिकडून हात मारून पोट भरतात.रस्ते बनवण्याची बुद्धी त्यांचेकडे नाहीच.ते चिखलातून उगवलेले कमळ आहेत.म्हणून हा चिखल जतन करून ठेवला आहे.
येथे नगरसेवक कापसेंची शाळा आहे.नांव पण सुंदर आहे.स्वामी समर्थ! आणि नागरिक असमर्थ!! पोरं शाळेत आणि बाप गटारीत.त्या शाळेतील संडास चे पाणी असे रस्त्यावर वाहात आहे.व्वा रे नगरसेवक! नगरसेवक आहेत कि नगरभक्षक?तरीही येथील मतदारांनी त्याचे कुटुंबातील तीन नगरसेवक निवडून दिले आहेत.किती पुण्यवान असतील ही माणसे?किती गुणवान असतील हे मतदार ? छत्रपती शिवाजी महाराज,या मतदारांना सद्बुद्धी द्या.
जळगाव शहराचे हे भयंकर चित्र बदलण्याची गरज आहे.म्हणून आधी नगरसेवक बदलण्याची गरज आहे.आत्ताचा नगरसेवक पुन्हा नकोच!कितीही पैसे दिले तरीही नकोच!उलट त्यांनी दिलेले आधीचे पैसे परत करू.हरामाच्या कमाईचे पैसे असा सत्यानाश करतात.पुन्हा नकोच असा सत्यानाश!
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या