Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी एकजूट असणे आवश्यक


विश्व आदिवासी दीन कार्यक्रम अध्यक्ष गोवर्धन कुंभरे यांचे प्रतिपादन 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा:- आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता, विशिष्ट ओळख, संस्कृती, आत्मसन्मान व अधिकाराच्या संरक्षणासाठी आदिवासी बांधव एकजूट राहिल्यास उत्थान होऊन खरे आदिवासी सुरक्षित राहतील. असे विश्व आदिवासी दिनानिमित्त ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन शाखा लाखनी द्वारा आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे यांनी आपले विचार व्यक्त केले. 
               ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन शाखा लाखनी तथा नॅशनल इन्स्टिट्यूट पीपल्स, वुमेन्स, स्टूडंट फेडरेशन नागपूर चे वतीने बुधवार(ता.९) रोजी बडगे सिलेब्राशन हॉल केसलवाडा/फाटा येथे विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके, अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे, प्रमुख मार्गदर्शक तहसीलदार निवृत्ती उईके, मुख्याध्यापक गौरीशंकर सलामे, गोंडवाना गणतंत्र पार्टी भंडारा अध्यक्ष मुकेश धुर्वे, किशोर कुंभरे, प्रमोद वरकडे, अजबराव चचाने, शरद मरसकोल्हे, एन.जी. वरकडे, ज्ञानेश्वर मडावी, सतृगण न्यायमूर्ती, केंद्र प्रमुख सुनीता मरसकोल्हे, भंडारा पंचायत समिती सदस्य कांचन वरठे, प्रमुख उपस्थितांमध्ये पांडुरंग खंडाते, पुरुषोत्तम वरकळे, माजी नगरसेवक भोला उईके, शालिक मडावी, केन्द्र प्रमुख भास्कर पेंदाम, किशोर आळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम सकाळी ९:०० ते २:०० वाजतापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाज प्रबोधन व विद्यार्थी मार्गदर्शनास सुरुवात करण्यात आली. आदिवासींच्या दैवतांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, जल-जंगल-जमीन विषयक माहिती, वास्तविक लेखनसाहित्य समजून त्याचे जतन तथा संवर्धन करण्यासाठी सक्रिय होऊन तन,मन, धनाने सहकार्याचे आवाहन केले. आदिवासी समाजातील इयत्ता १०वी व १२वी मध्ये ७५ टक्के गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संजय उईके, कैलास परतेकी, गजीराम खंडाते, अमरसिंग उईके, गणेश टेकाम, संजय पेंदाम, ललित मडावी, रजनी आत्राम यांचेसह ऑल आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या