Ticker

6/recent/ticker-posts

तुमसर जवळच्या खरबी येथे भीषण अपघात, पती-पत्नी जागीच ठार

टिप्परने दांपत्याला चिरडल्याने नागरिकांचा संताप अनावर

भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मौजा खरबी जवळ नातेवाईकाशी रस्त्याच्या बाजूला बोलत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने एका दाम्पत्याला अक्षरश: चिरडले. बालचंद ठोंबरे (५५), व त्यांची पत्नी अनिता ठोंबरे (५२) रा. सोनोली ता. मोहाडी हल्ली मुक्काम स्टेशन टोली, देव्हाडी असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तुमसर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथे घडली.
अपघातानंतर संतप्त झालेले नातेवाईक व नागरिकांनी रास्त रोकाे करीत मृतदेह उचलण्यास नकार दिला. यावेळी तणाव निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बालचंद ठोंबरे व त्यांची पत्नी अनिता हे दाम्पत्य मुलगी व जावयाला भेटण्याकरिता गेले होते. स्टेशनटोली ( दे.) येथे दुचाकीने परत येताना खरबी शिवारात रस्त्याच्या कडेला ते थांबले. त्याचवेळी तिथे असलेल्या नातेवाईकांशी बोलत असताना विरुद्ध दिशेने येणारा भरधाव टिप्परने त्यांना अक्षरश: चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट देत नागरिकांची समजूत काढली. यावेळी तुमसर व मोहाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. तब्बल दीड तासानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. बालचंद ठोंबरे हे तुमसर रोड येथे रेल्वेत कार्यरत होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पुढील तपास मोहाडी पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या