Ticker

6/recent/ticker-posts

अवैध्य दारू विक्रेत्याकडून महिला सरपंचाचा विनयभंग ..!



लाखणी तालुक्यातील मुरमाडी/तूप येथील घटना


लाखणी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
 
भंडारा : - अवैध्य दारूची वाहतूक व विक्री करण्याचे प्रयत्नात असलेल्या दारू विक्रेत्यास पकडण्यासाठी दारू बंदी समितीसह गेलेल्या महिला सरपंचास ढकलढुकल करून  जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पालांदुर पोलिसांनी अवैध्य दारू विक्रेत्यांवर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात  केला आहे. पीडित महिला सरपंचाचे नाव सुषमा प्रकाश चुटे (३०) मुरमाडी/ तूप तर अवैध्य दारू विक्रेत्या आरोपीचे नाव अमर राजू शिंदे राहणार रामपुरी तालुका लाखनी असे आहे . 
      मुरमाडी/ तूप येथे अवैध्य देशी दारू विक्रीचे प्रमाणात सातत्याने वाढ होत होती . गावातील काही सार्वजनिक चौरस्ते , पानटपऱ्या , गावातून बाहेर जाणारे रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्रालगत शिवाय काही दारू विक्रेत्यांचे घरी अवैध्य दारू विक्री होत असल्याने याठिकाणी मध्यपिंची जत्रा भरत असे . सायंकाळचे सुमारास आवश्यक कामासाठी महिलांना घराबाहेर पडणे कठीण होत असे . मध्यपी आपली हौस भागविण्यासाठी घराबाहेर ठेवलेल्या सामानाची चोरी करण्यास मागेपुढे पाहत नसत त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे  प्रमानात वाढ झाली होती. अवैध्य दारूची झळ महिला व मुलांना सोसावी लागत असे याप्रकाराने गावाचे आरोग्य बिघडण्याचे मार्गावर होते . सरपंच सुषमा प्रकाश चुटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनीषा माणिक वालोदे, यांचे पुढाकाराने गावात गावकऱ्यांचे सहकार्याने दारू बंदी समिती स्थापन करून अवैध्य दारू विक्रेत्यांविरूध्द एल्गार पुकारण्यात आला . 
     सरपंच  सुषमा चूटे, तमुस अध्यक्ष मनीषा वालोदे, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका बावनकुळे , शीतल गोधे , माधुरी रामटेके , स्वाती चुटे, सुरेखा धोटे , उपसरपंच मेघनाथ मेश्राम , सदस्य दिगंबर बावनकुळे , कैलास कठाने , सामाजिक कार्यकर्त्या शाहीन पठाण , लता गोधे ,मीरा धोटे , गया चुटे , बेबी राऊत ह्या दारू बंदी समितीला अवैध्य दारू विक्री होणार असल्याचे माहिती होताच त्याठिकाणी दबा धरुन बसले असता अमर रामू शिंदे हा दारू विक्री करीत असल्याचे निदर्शनास येताच त्याला पकडण्याचे प्रयत्नात त्याने महिला सरपंचाशी हातापाई करून जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाला . महिला सरपंचाचे फिर्यादीवरून पालांदुर पोलिसांनी अवैध्य दारू विक्रेत्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे . 
 
सध्या दारू विक्री बंद 

अवैध्य दारू विक्रेत्याने महिला सरपंचाशी असभ्य व्यवहार केल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांना देण्यात आली . त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी येऊन  पालांदूर पोलिसांची अवैध्य  धंद्याबाबद कानउघाडणी केल्याने सध्या दारू विक्री बंद आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या