Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या लपंडावाणे धान उत्पादक शेतकरी त्रस्त

पिंपळगाव / सडक महसूल मंडळातील प्रकार


 कृषी फिडरवरून नियमित वीज  पुरवठा नाही

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा :- मागील दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतजमिनीस  भेगा पडून धान पिकासह भाजीपालाजन्य पिके वाळण्याचे मार्गावर असताना कमी दाबाचे कारण समोर करून वीज वितरण कंपनीकडून कृषीकरिता दररोज देण्यात येणारा ८ तास वीज पुरवठा मागील ५ दिवसापासून अनियमित केल्याने धान उत्पादक सिंचन सोयीपासून वंचित झाल्यामुळे पिकांची वाईट स्थिती झाल्याने धान उत्पादक त्रस्त झाला आहे अनियमित वीज पुरवठा  करणारा तो अधिकारी कोण ? याचा शोध घेऊन त्याचेवर महावितरनाणे कारवाई करणे गरजेचे झाले आहे . 
     लाखनी तालुक्यात महसूल विभागाचे कामकाज सुचारु पद्धतीने चालावे याकरिता लाखनी , पिंपळगाव/सडक ,मुरमाडी/तूप, पालांदुर व पोहरा अशी पाच महसूल मंडळाची निर्मिती करण्यात आली. पिंपळगाव महसूल मंडळात  लाखोरी , सालेभाटा , केसलवाडा / पवार , मोरगाव , पिंपळगाव इत्यादी तलाठी साझ्यासह १७ ते १८ गावे समाविष्ट असून भौगोलिक क्षेत्र ६ हजार २९० हेक्टर आहे . सामेवाडा, सालेभाटा, बोरगाव , मासलमेटा, राजेगाव , मोरगाव , नीलागोंदी , गुढरी, सिंगोरी , आलेसुर इत्यादी गावातील अंदाजे ३ हजार १२८ हेक्टर क्षेत्रात धानासह भाजीपालाजन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. सिंचनाची सोय उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी कार्यालय पिंपळगाव / सडक यांचेकडून वीज पुरवठा केला जातो . 
      धानाची रोवणी झाली असून धान पीक वाढीचे अवस्थेत असले तरी मागील दहा दिवसापासून पाऊस झाला नसल्याने शेतजमिनीस भेगा पडल्या आहेत. वीज वितरण कंपनीकडून कृषी क्षेत्रास दररोज ८ तास नियमित वीज पुरवठा केला जाईल अशी धान उत्पादकांची अपेक्षा होती पण वीज वितरण कंपनीकडून अनियमित व ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळ वीज पुरवठा केला जात असल्यामुळे " दुष्काळात तेरावा महिना" अशी शेतकऱ्यांची अवस्था होऊन त्रस्त झाले आहेत . वीज वितरण कंपनीने धान उत्पादकांचा अंत न पाहता शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. 
 

प्रतिक्रिया
महावितरण करून शेतीला ८ तास नियमित वीज पुरवठा केला जातो. पण अचानक कमी दाबामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज मिळण्यास व्यत्यय  येत असला तरी यानंतर शेतीला अखंडित आणि नियमित वीज पुरवठा केला जाईल. 
 
राजन लिमजे , उपकार्यकारी अभियंता महावितरण लाखनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या