Ticker

6/recent/ticker-posts

शूरवीर सैनिकांमुळेच आपण घरी निवांतपणे झोप घेतो


• सरपंच शेषराव वंजारी यांचे प्रतिपादन 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा :- उन, वारा, पावसात अनेक संकटांचा सामना करिता सीमेवर परकीय आक्रमणापासून सैनिक देशाचे रक्षण करतात. मातृभूमीचे सेवेसाठी ना नुकुर न करता मृत्यूलाही कवटाळण्यास मागे पुढे पाहत नाही. त्यामुळेच आपण सर्व देशवासी घरी निवांतपणे सुखाची झोप घेतो. असे मुरमाडी/सावरी ग्रामपंचायतीचे सरपंच शेषराव वंजारी यांनी आझादी का अमृत महोत्सव प्रसंगी ग्रामपंचायतीचे वतीने शनिवारी(ता.१२) माजी सैनिकांचा सन्मान समारोह प्रसंगी शूरवीर सैनिकांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देताना गौरवोद्गार काढून कृतज्ञता व्यक्त केली.  
             आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम प्रसंगी शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामपंचायत मुरमाडी/सावरी चे वतीने माजी सैनिक सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच शेषराव वंजारी, प्रमुख अतिथी ग्रामविकास अधिकारी एस.पी. तरजुले, उपसरपंच वनिता शेंडे, ग्रामपंचायत सदस्य संजय लांजेवार, काशिनाथ मिरासे, बालू बावनकुळे, आतिश झलके, नरेंद्र चोले, नंदलाल चौधरी, दुर्गेश चोले, किरण टेंभुर्णीकर, जयपाल उईके, ग्रामपंचायत सदस्या मनीषा बेलखोडे, संध्या गजभिये, वैशाली मेश्राम, शीतल हटवार, गीता गिरेपुंजे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांचे हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शूरवीर सैनिकांबाबद माहिती देऊन गुणगौरव केला. त्यानंतर कॅप्टन रवींद्र गायधने, कॅप्टन चंद्रमणी वैद्य, श्रावण कानतोडे, श्रीकृष्ण बावनकुळे, विकास शेंडे, सुरेश शेंडे, नितीन चोले, श्रावण बारई, मनिराम खराबे, प्रकाश भुते, केवळराम वंजारी, नरेश रामटेके, मधुकर लाडे, प्रमोद मस्के, गणपत तीतिरमारे, रमेश उईके, खोटेले, जगनाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांनीही आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस. पी. तरजुले तर आभार संदीप पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप धांडे, संदीप सलामे, मोहन चवळे, उषा बेलखोडे, वर्षा पडोळे, मंगेश गेडाम, स्मिता बोरकर, योगेंद्र वाघमारे, आकाश भुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या