रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा ;- दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आहे रक्षाबंदनाच्या दिवशी बहीण भावाच्या उजव्या हाताच्या मंगटावर राखी बांधून आयुष्यभर रक्षण आणि प्रेमाने राहण्याची अपेक्षा करते मात्र या सर्व प्रकाराला बगल देत भंडाऱ्यातील ओबीसी क्रांती मोर्चा महिला संघटनेच्या वतीने शहरातील शितला माता मंदिर आणि खांब तलाव चौक,शास्त्री चौक राजीव गांधी व शहरातील सर्व चौकातील खड्डामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर दररोज छोटे मोठे किरकोळ अपघात होऊन अनेक लोकांना अपंगत्व आले असून तरी सुद्धा नगर प्रशासन जिल्हा प्रशासन जागे झाले नसल्यामुळे आमदार,खासदार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चा महिला संघटनेच्या वतीने चौकातील खड्डे असलेल्या ठिकाणी त्या खड्ड्यात विधिवत पूजा अर्चना करून रस्त्यावरील खड्ड्याना भाऊ मानून चक्क राखी बांधून त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करीत असतांना कोणत्या प्रकारचे अपघात घडू नको आणि माझ्या भावांना माझ्या परिवाराला सुखकर प्रवास होऊन दे असे खड्ड्याला मागणे घालत ओबीसी क्रांती मोर्चा महिला संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.या प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चा महिलाध्यक्ष शोभा बावनकर मीना ठवकर,विद्या मदनकर,कल्याणी मते,सोमेश्वर मदनकर,किरण मते,जीवन भजनकर,तामेश लेंडे, सुधीर सार्वे, नचीकेत मते, मारुती राऊत,ऐश्ववि पंचबुधे,याशिका घोडीचोर,ऋतुजा सोनवाने उपस्थित होते.
संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष ;- आपल्या देशातील वैज्ञानिक चंद्रावर चंद्रयान पाठवून नवनवे संशोधन करीत आहेत.आणि एकीकडे भंडारा शहरातील नगर प्रशासन जिल्हा प्रशासन व आमदार खासदार निद्रावस्थेत असून शहरातील रस्त्यावरील अपघाती खड्डे यांना आपले भाऊ मानत राखी बांधून ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेने निषेध नोंदविला आहे.


0 टिप्पण्या