Ticker

6/recent/ticker-posts

कौशल्य विकास ऑनलाइन प्रशिक्षणाचे मार्गदर्शन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम्सच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास पोटोड़े आणि डीन डॉ. राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. हर्षद रामटेक, प्रकल्प समन्वयक, टाटा सर्व्हिसेस, नागपूर यांनी विद्यार्थ्यांना विविध ऑनलाइन कौशल्य विकास अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली. या ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच रोजगाराच्या संधी, कंपनी इंटर्नशिप आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीने होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे व शंकांचेही श्री. रामटेक यांनी समाधानकारक निराकरण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा आधुनिक कौशल्य विकासाच्या संधी मिळणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रणिता दत्ता, प्रा. जयंत रामटेके, प्रा. नरेश वाघमारे, प्रा. कपिल रामटेके, प्रा. अश्विनी नकाडे, प्रा. अनिकेत चिरवतकर, प्रा. निश्चल राऊत तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन जंयत सोनटक्के,आभार प्रा. परेश वाघमारे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या