Ticker

6/recent/ticker-posts

वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडी येथे हृदयद्रावक घटना..!

चक्क शेतकऱ्याच्या काळजावर घाव..!

द्वेषभावनेतून केळी पिकांवर नाशक रसायनाची फवारणी; लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हिंगोली:- जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

खाजमापूर वाडी येथील शेतकरी उमेश बाबाराव मुके यांच्या शेतातील केळी पिकांचे अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून नुकसान केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, मनातील द्वेषभावनेतून त्यांच्या केळी पिकांवर नाशक रसायनाची फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रकार एकदा नव्हे, तर तब्बल दोन वेळा घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वर्षभर कष्ट करून, पाणी, खत, औषधांचा खर्च करून आणि मोठ्या आशेने वाढवलेले केळीचे पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

एका बाजूला शेतीचा वाढता खर्च, हवामानातील बदल आणि बाजारभावाची चिंता; तर दुसऱ्या बाजूला कष्टाने उभे केलेले पीक अशा पद्धतीने नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, शेतकऱ्यांच्या मते हा प्रकार केवळ पिकांचे नुकसान नसून, त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर आणि आर्थिक आधारावर घाला घालण्याचा प्रकार आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घेण्यात यावा आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात घुसून जाणूनबुजून पिकांचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करून मुसक्या आवळल्या पाहिजेत, असा सवालही यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते?
केळी पिकांचे नुकसान नेमके कोणी केले?
या घटनेमागे वैयक्तिक द्वेषभावना आहे का?
आणि शेतकऱ्याच्या लाखो रुपयांच्या नुकसानीची भरपाई कोण करून देणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.

मात्र, वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक अशा प्रकारे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच घाला घालणाऱ्या या प्रकाराचा निषेध होत असून, दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या