मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद - वंचित बहुजन आघाडी कळंब तालुक्याच्या वतीने कळंब येथील पंचायत समिती सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी बी.डी.शिंदे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद ,धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव ,प्रा.अरविंद खांडके सर जिल्हा प्रवक्ते ,ॲड.लक्ष्मण खुणे जिल्हा उपाध्यक्ष ,श्रीकांत राऊत तालुकाध्यक्ष कळंब ,रसूल खान शहराध्यक्ष कळंब ,धिरज शिंदे जिल्हा महासचिव युवा आघाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कळंब तालुका हा बहुजन चळवळी चा उस्मानाबाद जिल्ह्यामधील केंद्रबिंदू असल्यासारखा आहे या कळंब तालुक्या मध्ये आंबेडकरी चळवळीमधील तरुण युवक अनेक छोट्या मोठ्या पक्ष संघटनांमध्ये काम करतात सध्याची सामाजिक राजकीय राज्यातील देशातील परिस्थिती पाहता या सर्व तरुणांनी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्येच काम करावे येथील वंचित शोषित पीडित बहुजन समाजासमोर वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा कुठलाही सक्षम पर्याय असू शकत नाही व ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय संपुर्ण देशामध्ये इथल्या शोषित पीडित अल्पसंख्यांक वंचित बहुजन समाजा साठी समाजकारण राजकारण करणारे दुसरे नेतृत्व नाही त्यामुळे काळाची गरज ओळखून आता ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करणे व वंचित बहुजन आघाडी मध्येच काम करणे ही गरज लक्षात घेऊन या आढावा बैठकीचे आयोजन ॲड.आबासाहेब पायाळ ,डी.टी वाघमारे (आण्णा) ,बि.एम.आव्हाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आज बैठकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे ,रिपब्लिकन पँथर सेना चे आशोक कसबे त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर रित्या प्रवेश केला याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत, गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. तरच वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून आपण होऊ घातलेल्या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण जिंकू. त्यासाठी बुथ बांधणी पासून नियोजन करत आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याची सोबतीची अपेक्षा करतो ही लढाई आपणाला जिंकायचीच आहे, असे प्रतिपादन केले.
धनंजय सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कळंब येथील आंबेडकर चळवळीतील तरुणांनी नेत्यांनी श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय उस्मानाबाद जिल्ह्यामधील चळवळीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना दिशा दर्शविणारा ठरणारा आहे. आज ही कळंब मधून सुरुवात झाली आहे, उद्या संपूर्ण जिल्ह्यामधील छोट्या मोठ्या पक्षांमधील कार्यकर्ते नेते वंचित बहुजन आघाडी सोबत आल्याशिवाय राहणार नाहीत आसे म्हटले.
याप्रसंगी अनिल हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकाच विचारधारेवर वेगवेगळ्या मार्गाने काम करताना आपण आपले उचित ध्येय साध्य करू शकणार नाहीत त्यासाठी आपणा सर्वांना वंचित बहुजन आघाडी या एकाच पक्षाच्या झेंड्याखाली व श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर भविष्यामध्ये भाजप सारख्या पक्षांना रोखायचे असेल तर स्वाभिमानी नेते ॲड श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. त्यामुळे आज आम्ही सर्वांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रसंगी अशोक कसबे ,डि.टि. वाघमारे (आण्णा) प्रा.अरविंद खांडके सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना बि.एम.आव्हाड सर यांनी उपस्थित जनसमुदाय पाहता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहता ही आजची बैठक यशस्वी झाली असून पदाधिकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे बुथनिहाय बांधणी बूथ प्रमुखांची निवड गाव तिथे शाखा या पद्धतीने पुढील काळामध्ये आपण व्यापक पद्धतीने कळंब तालुक्यामधून वंचित बहुजन आघाडी पक्षाची मजबूत बांधणी करू, यासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे असे म्हणत ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करूया. पुढील काळामध्ये देखील आपल्याला अनेक छोट्या मोठ्या पक्षांमधील पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यासाठी संपर्क आणि संवाद वाढवावा लागेल असे म्हटले.
या बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष परांडा महावीर बनसोडे व मनोज सिंगनाथ हे आवर्जून उपस्थित होते तसेच शिवाजीराव कांबळे ,उमेश कांबळे ,अरून गरड ,सुधाकर रणदिवे, उत्तरेश्वर उबाळे ,आकाश गायकवाड ,प्रशांत धावारे ,मनोज गाडे, अरुण कांबळे ,संजय सावंत ,राहुल गाडे ,सुरज सोनके ,संतोष सोनवणे, प्रवीण शिंदे ,उत्तम सावंत ,सुहास शिंदे , अक्षय हजारे ,सुरज वाघमारे, विशाल वाघमारे ,अभिजीत कांबळे ,आकाश रणदिवे ,रवी चराटे ,सुरज जानराव ,राजरत्न गाडे ,शंकर गायकवाड ,पृथ्वीरत्न गाडे ,बी.जे शिंदे ,हर्षवर्धन पोटभरे ,महादेव सावंत ,ज्ञानेश्वर पाटोळे ,सुरज शिंदे व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या बैठकीसाठी उपस्थित होते.


0 टिप्पण्या