🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - १२ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. २१ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : अधिक श्रावण
पक्ष : कृष्ण
तिथी : एकादशी (०६.३०) ~ द्वादशी
वार : शनिवार
नक्षत्र : आर्द्रा (अहोरात्र)
राशी : मिथुन
*कमला एकादशी*
*परम एकादशी*
*दयानंद बांदोडकर पुण्यस्मरण*(गोव्याचे पहिले मुख्यमंत्री)
आंतरराष्ट्रीय हत्ती दिन
आंतरराष्ट्रीय युवा दिन
२०१० : मुंबई मध्ये मग्रुर रिक्षा व टॅक्सी चालकांना आवर घालण्या साठी जागरुक प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने 'मीटर जॅम' आंदोलन पुकारले.
२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
१९८९ : कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ’जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.
१९८५ : जपान एरलाइन्स फ्लाइट १२३ हे विमान माउंट ओगुरावर कोसळले. ५२० ठार.
१९८२ : परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
१९८१ : आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
१९६४ : वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी.
१९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९५३ : सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
१९५२: मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या.
१९४८ : लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
१९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.
१९२२ : राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९२० : शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१८५१ : आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
जन्मदिवस
१८०१: ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक जॉन कॅडबरी
१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात
१९१० : युसोफ बिन इशाक,, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
१९१९ : विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक, भौतिक शास्त्रज्ञ
१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर
१९२६: गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर
१९४८: फकीरा मुंजाजी तथा फ.मुं. शिंदे, कवी, समीक्षक व अनुवादक
१९५९: प्रवीण ठिपसे, बुद्धीबळपटू
मृत्यूदिन
१९६४: इयान फ्लेमिंग, गुप्तहेर, जेम्स बाँडचा जनक
१९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास
१९७३: दयानंद बांदोडकर, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री
*।। दास-वाणी ।।*
हरिकथेसी भावबळे ।
गेला रंग तो तुंबळे ।
निमिष्य येक जरी आकळे ।
ध्यानी परमात्मा ।।
रागज्ञान ताळज्ञान ।
स्वरज्ञानेसीं वित्पन्न ।
अर्थान्वयाचें कीर्तन ।
करूं जाणे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०५/२६-२८
हरिकथेमधे कीर्तनकार जर कुठे भरकटला, भक्तिरसाऐवजी शृंगारादि रस जर बळावले, तर कीर्तनाचा रंगच पालटून जातो. अशा वेळी पुन्हा उत्कट भक्तीभावाने परमेश्वराला साद दिली अन् क्षणभर जरी परमात्म्याचे ध्यान लागले तर कीर्तन सार्थकी लागते.
मुळातच वेदशास्त्रव्युत्पन्न असलेला हरिकथाकार मग उत्तम रागज्ञान, तालज्ञान आणि स्वरज्ञानाची परिसीमा गाठून अन्वयार्थाचे अत्यंत नेटके आणि सुसंबद्ध कीर्तन करतो. अशा कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध होतातच, शिवाय परमेश्वरही प्रसन्न होतो.
हरिकथालक्षणनाम समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या