बहुजन क्रांती मोर्चात एकीचे दर्शन
औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे.
मो.8308128457,
पैठण राष्ट्रीय अदिवासी एकता परिषदेने पुकारलेल्या भारत बंदला पैठण शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत बुहूजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा काढून केंद्र सरकार व मणीपुर सरकारचा निषेध नोंदविला. पैठण शहर बंद करून शहरातील नेहरू चौक येथून मोर्चाला प्रारंभ करून तहसिल कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात आला .
मणिपुर येथील अदिवासी महिलांची नग्न धिंड काढून अमानवी कृत्य त्याठिकाणी केल्याने व बहुजन समाजातील अनुसुचित जाती ,अनुसुचित जमाती ,इतर मागासवर्ग तसेच धर्मपरिवर्तीत अल्पसंख्याक समुदयाच्या संविधानिक हक्क अधिकारावर गदा आणणा-या समान नागरी कायद्याच्या विरोधात व महापुरूषांच्या केलेल्या अवमान प्रकरणी राष्ट्रीय अदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून भारत बंदचे अवाहन करण्यात आले होते त्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी देशपातळीवर भारत बंदला समर्थन दिले असल्याने देशाच्या प्रत्येक राज्यात बहूजन क्रांती मोर्चा या नावावर आपपल्या राज्यातील फुले शाहू आंबेडकर तथा ओबिसी संघटनांनी पाठिंवा दिला होता .
त्याचाच एक भाग म्हणून पैठण दि ७ वार सोमवार रोजी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीले पैठण बंदची हाक देवून महामोर्चा काढला व केंद्र सरकार व मणिपुर सरकारचा निषेध नोंदवत महिला पुरूषांनी शहरातील नेहरू चौकातून हिरवे ,पिवळे ;निळे ,भगवे ध्वज व सरकारच्या विरोधातील फलक हातात घेवून सर्व बहुजन महापुरूषांना अभिवादन करत तहसिल कार्यालयावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करून तहसिलदार सारंग चव्हाण यांना निवेदन देवून मोर्चाचा समारोप करण्यात आला .यामध्ये भारत मुक्ती मोर्चा ,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ए ,बहुजन मुक्ती पार्टी ,बंचित बहुजन अघाडी ,एकलव्य संघटना (शिवाजीराव ढवळे )शेतकरी कामगार पक्ष ,समता परिषद व मुस्लिम बांधवांच्या संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता यावेळी सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला व पुरूषांचा मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर स्थानिक पोलिस प्रशासनाच्या वतिने मोठा पोलिस पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता


0 टिप्पण्या