Ticker

6/recent/ticker-posts

मुरामाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य समितीचे गठण

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा :-लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्रात २ आयुर्वेदिक दवाखान्यासह, ६ आरोग्य उपकेंद्रात २१ गावे समाविष्ट असून या गावातील समाजाच्या शेवटच्या घटकातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा. या करिता जिल्हा परिषद सदस्य गजानन(गणेश) निरगुळे यांचे अध्यक्षतेखाली जनआरोग्य समितीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष जि.प. सदस्य गजानन निरगुळे, सहअध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील हटनागर, सदस्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य सरिता कापसे, पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे, सुरेश झंझाड, योगिता झलके, आरोग्य सहायिका एस.एस. मांढरे, बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे कनिष्ठ अभियंता नीलम हलमारे, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मुरमाडी/तूप चे प्राचार्य एन.झेड. वासनिक, पंचायत समिती चे कनिष्ठ अभियंता महाकाळकर, मुरमाडी चे सरपंच सुषमा चूटे, दिघोरी चे सरपंच शरद ईटवले, कोलारी चे सरपंच उमेश झंझाड, खराशी चे सरपंच योगेश झलके, पालांदूर चे सरपंच लता कापसे, मरेगाव चे सरपंच शामराव बेंदवार, आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ. अर्चना सोनटक्के, विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये झरप चे सरपंच जगदीश भोयर, गटप्रवर्तक निवृत्ता शेंडे आणि सदस्य सचिव म्हणून मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. मरसकोल्हे यांची शासकीय परिपत्रकाप्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या