मो.9545914324
भंडारा :-लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच सिनियर नॅशनल ऑर्बिटर सागर सुरेश साखरे यांची १४ ते २७ ऑगस्ट रोजी पुणे येथे ६०व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या बुद्धिबळ इतिहासातील राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून नियुक्ती झालेले ते एकमेव व्यक्ती आहेत. त्यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले तसेच बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक भूषण श्रीवास यांचे आभार मानले. तर यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, सहकारी व मित्र मंडळींना दिले आहे.


0 टिप्पण्या