लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
मो 9689821132
नांदेड:- मराठा समाजाच्या मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांबाबत मौजे.अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे श्री.मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 29/08/2023 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली असून.अद्याप तरी त्यांच्या मागण्यांवर सरकार कडून कुठला ही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने.त्यांचे आमरण उपोषण सुरूच आहे.त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने.त्यांच्या या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी.दत्ता पाटील हडसणीकर यांनी या विषया संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे साहेब यांना आज हदगाव तहसील कार्यालया मार्फत लेखी निवेदन दिले असून.मनोज जरांगे पाटील यांनी या आगोदर देखील अनेक वेळा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण केलेले असून.प्रत्येक वेळी सरकारने त्यांना आश्वासन देत.त्यांची एक प्रकारे फसवणूक केली.असेच म्हणावं लागेल.अशी भावना दत्ता पाटील यांनी बोलताना व्यक्त करत.या वेळी सरकारने उद्या दिनांक 01/09/2023 पर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्यांना आमरण उपोषणा पासून परावृत्त करावे.अन्यथा दिनांक 02/09/2023 पासून मौजे.अंतरवाली सराटी येथील आमरण स्थळी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसणार असल्याचे.त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.


0 टिप्पण्या