Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - १६ ऑगष्ट
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २५ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   वर्षा
मास :  अधिक श्रावण  
पक्ष :   कृष्ण         
तिथी : अमावास्या (१५.००) ~ प्रतिपदा                     
वार :   बुधवार 
नक्षत्र : आश्लेषा (१७.००) ~ मघा                           
राशी : कर्क (१७.००) ~ सिंह 

*अधिक श्रावण अमावास्या* (समाप्ती दुपारी ३ वाजता)
*पुरूषोत्तम/मल/अधिक श्रावण मास समाप्ती* 
*अन्वाधान (अग्निहोत्र)*
*नक्त व्रतारंभ*

*De Jure Transfer Day*
(या दिवशी पुडुचेरी प्रदेश भारतात विलीन झाला.)

*पारसी नूतन वर्ष १३९३ प्रारंभ* नौरोज मुबारक

*भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पुण्यस्मरण*

१९४६ : कोलकात्यात कत्लेआममुळे एका दिवसात  ४००० हिंदू मारले गेले व एक लाखाहून जास्त बेघर झाले.
१९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच वसाहतींचे प्रदेश भारताला देण्यात आले.  
२०१० :  चीन, जपानला मागे टाकून जगातील दोन क्रमांकाची अर्थ व्यवस्था बनली.

जन्मदिवस 
१८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर. १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ’महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले.
१९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान 
१९५२:  कीर्ती शिलेदार, गायिका व अभिनेत्री 
१९५४: पार्श्वगायिका हेमलता
१९५७ : आर. आर. पाटील, वकील व मंत्री 
१९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना.
१९६८ : अरविंद केजरिवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री 
१९७० : मनीषा कोईराला, नेपाळी व भारतीय अभिनेत्री. 

मृत्यूदिन 
१८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली.
१८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन 
१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर 
१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नसरत फतेह अली खान 
२०००: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक.
२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन 
२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे 
२०१८ : भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी, पूर्व प्रधान मंत्री व कवि.

*।। दासवाणी ।।* 

उदंड कल्पांत जाला । 
तरी नाश नाही तयाला । 
मायात्यागें शाश्वताला । 
वोळखावें ।। 

देव अंतरात्मा सगुण । 
सगुणे पाविजे निर्गुण । 
निर्गुणज्ञानें विज्ञान । 
होत असे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १४/०९/१२-१३ 

अनेक कल्पांतांच्या वेळी जीव सृष्टीचा असंख्य वेळा नाश झालेला आहे.
पुनरपि मरणम् पुनरपि जननं  । 
हा सृष्टीचा नियमच आहे.
परंतु सृष्टी नाश पावली तरी जे अखंड
अविनाशी एकमेव तत्व आहे ते परब्रह्म होय.
मायिक सृष्टी अनित्यच आहे हे समजून तिचे निरसन करून नित्य शाश्वत परब्रह्माला जाणणे हे साधकाचे उद्दिष्ट हवे.

प्रत्येक जीवामधे अंतरात्मा असतो.
ते ईश्वराचे सगुण रूप आहे.
याच सगुणाचेनि आधारे । 
निर्गुण पाविजेनि निर्धारे । 
येथ सारासारविचारे । 
संतसंगे  ।। 
सद्गुरूंच्या सानिध्यात साधक निर्गुणाचे ज्ञान प्राप्त करतो. विज्ञान म्हणजे परब्रह्माची अनुभूती हा साधनेचा अंतिम टप्पा म्हणजेच सिद्धत्वाची प्राप्ती होय.

शाश्वतनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या