Ticker

6/recent/ticker-posts

पैठण तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाचा झंजावात,,,,,,,

विविध ठिकाणी शाखेच्या नामफलकाचे उदघाटन............

 गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद

औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील गिधाडा,धनगाव,ईसारवाडी, या गावापाठोपाठ तालुक्यातील चितेगाव रमानगर येथे दि.९/८/२०२३ वार गुरुवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाची महिला आघाडीच्या शाखेचे नामफलकाचे  उदघाटन करण्यात आले.यावेळी युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव संघटक  मा.अमोल भैया नरवडे,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मा.संजय भाऊ ठोकळ,पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ मामा साळवे,तालुका उपाध्यक्ष गौतम सोनवणे,तालुका उपाध्यक्ष एकनाथ शरनागत,राजेश नाडे,बाबा गवळी,रहिम भाई,रामदास जगधणे यांची उपस्थिती होती.तसेच दि.१०/८/२०२३ शुक्रवार रोजी तालुक्यातील कारकीन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाची युवा आघाडीची शाखेचे नामफलकाचे उदघाटन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवा आघाडीचे सचिव संघटक मा.अमोल भैया नरवडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गौतम भाऊ नरवडे,कांतीलाल हिवराळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या