Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी,मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी,उस्मानाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारीकऱ्यांच्या वतीने जिलाधिकारी उस्मानाबाद यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,भारतात मणिपूर,हरियाणा मध्ये जातीय हिंसाचारात नागरिक जळत असताना,मागच्या काही दिवसा पासून पुरोगामी महाराष्ट्रात पोक्षे आणि मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे ) सारखी जातीवादी माणसं जाणीवपूर्वक या पुरोगामी महाराष्ट्रातील थोर महामानवांवर गलिच्छ भाषेमध्ये टिका टिप्पणी करत जाणीवपूर्वक पुरोगामी महाराष्ट्रात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मात्र या सगळ्या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करून जातीवादी नराधमांना अभय देण्याचेच काम करत आहेत.त्यामुळं आपण महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था निकोप ठेवण्यासाठी अपयशी ठरत आहात.तर मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.कारण राज्या मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जवाबदारी आपली असून आपण जनतेचे सेवक आहात,याचा आपणास विसर पडत आहे,असे निवेदन म्हटले आहे.या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे जि. संघटक विजय बनसोडे,ता.संस्कार सचिव आदिनाथ सरवदे,ता.सरचिटणीस उमाजी गायकवाड,ता.संघटक महादेव ऐडके,सामाजिक कार्यकर्ते युवराज पौळ, मुकेश मोठे,बाबासाहेब कांबळे,सोहन बनसोडे,अतुल लष्करे, भोंग पुरुषोत्तम,ऐडके आदित्य, बाळासाहेब भोरे, प्रभाकर सोनवणे,तानाजी कांबळे, अशोक माने,महादेव रसाळ,ज्ञानेश्वर पेठे, नितीन क्षीरसागर,आप्पासाहेब सिरसाठे,कुंदन शिंदे,शैलेश गडबडे, रोकडे शंभूनाथ इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या