सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर
सोलापूर :- वानखेडा ता.जाफ्राबाद जि.जालना येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंती निमित्त भारतीय दलित संसद वानखेडा शाखेचा उदघाटन मोहिते पाटील समर्थक ,पश्चिम महाराष्ट्र विभाग,कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना खंडागळे यांनी भारतीय दलित संसदे बद्दल माहिती दिली व मातंग समाजातील युवकानी भारतीय दलित संसदेत सक्रिय व्हावे असे आवाहन ही केले या वेळी संपर्क प्रमुख तथा अडगावचे उपसरपंच, विलास खोतकर. कार्यक्रमाचे अध्यक्ष, वानखेडा गावाचे उपसरपंच, श्री अमोल आमले हे होते तर प्रमुख मार्गदर्शक, डॉ.अंबादास सगट हे होते. व्यसपीठावर किशोर दणके (प्रदेश सरचिटणीस भा.द.सं.) कचरू उमक (प्रवक्ता, भा.द.सं.), सौ. मंगल गायकवाड (जिल्हाधताक्षा, भा.द.सं.महिला आघाडी), सौ. संगीता भालेराव (प्रबोधन विभाग प्रमुख भा.द.सं.), सौ. संगीता शेजवळ (जिल्हा सरचिटणीस, महिला आघाडी भा.द.सं.), आदिनाथ उमक (फुलंब्री ता.अध्यक्ष भा.द.सं.), अशोक शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी निकाळजे (जाफ्राबाद तालुका संघटक, भा.द.सं.) व सौ.दुर्गा निकाळजे (जाफ्राबाद तालुका अध्यक्षा, महिला आघाडी, भा.द.सं.) यांच्या उत्तम संयोजनात कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
0 टिप्पण्या