Ticker

6/recent/ticker-posts

मौजा चिचखेडा येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू

धानाच्या पिकाला बोरवेलव्दारे पाणी देताना , विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा झाला मृत्यू

भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) 
मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा चिचखेडा येथील शेतकरी शेतावर बोरवेलद्वारे धानपिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव मुनेश्वर उर्फ बबलू महादेव सेलोकर ( वय ४७ वर्षे , रा. चिचखेडा) असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना दिनांक ८ ऑगष्ट २०२३ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चिचखेडा (ता. मोहाडी) येथे घटली. मुनेश्वर सेलोकर यांची गावात घराला लागूनच शेती आहे. 
आज सकाळी त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी बोरवेल सुरू केली. बोरवेलला विद्युत पुरवठा करणारा प्लास्टीक वायर पाण्यावर लोंबकळत असल्याने त्यांनी वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वायर कटलेला असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का लागून ते जागीच कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यामागे दोन तरुण मुले, पत्नी आहे. बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या