लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड:- संपर्क:-९६८९८२११३२
नांदेड हिमायतनगर . बहुप्रतिक्षित काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष कोण होणार याची चर्चा मागील दोन वर्षापासून हिमायतनगर तालुक्यात रंगली होती. त्या चर्चेला आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी पूर्णविराम मिळाला आहे आज नांदेड येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटवले व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मान्यतेनुसार व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची विश्वासू असलेली हिमायतनगर काँग्रेसची नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी म्हणून सर्वांच्या परिचयाचे असलेले गजानन सूर्यवंशी करंजीकर तर शहराध्यक्षपदी पुन्हा फेर निवड करण्यात आलेले संजय माने यांची आज जिल्हा काँग्रेस कमिटीने निवड केली आहे. या निवडीचे त्यांना पत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर आमदार माधवराव पाटील जवळगावकर आमदार अमर राजूरकर माजी आमदार डी. पी .सावंत काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर दिलीप पाटील बेटमोगरेकर सह हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, माजी संचालक रफिक सेठ ,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई ,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,योगेश चिलकावार, पंडित ढोणे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नासर पठाण करंजीकर आदींनी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना पुष्पहार घालून त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या