Ticker

6/recent/ticker-posts

रोजगार सेवकांचे गाव विकासात महत्त्वाचे योगदान

• गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांचे प्रतिपादन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा:- रोजगार सेवकांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी चे कामाव्यतिरिक्त ज्यांना घरकुल मंजूर आहे. पण कामास सुरुवात केली नाही अशांना घरकुल बांधण्यात प्रवृत्त करावे. त्याच प्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची मदत करणे, विविध शासकीय योजनांची कामे पूर्णत्वास नेण्यास मदत करणे अशी कामे केल्यास रोजगार सेवकांचे गाव विकासात महत्त्वाचे योगदान ठरेल. असे आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांनी सांगितले. 
            लाखनी येथील पंचायत समिती चे सभागृहात शनिवारी(ता.१२) ला रोजगार सेवक, संगणक परिचालक व तांत्रिक अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. मार्गदर्शक गटविकास अधिकारी अरुण के. गिरेपुंजे, प्रमुख उपस्थितांमध्ये कनिष्ठ लिपिक विश्र्वकांत मेश्राम, कार्यक्रम व्यवस्थापक महेंद्र साखरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गिरेपूंजे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांनी १ ऑगस्ट ला पदभार स्वीकारला असून ग्रामीण परिसरात अनेक समस्या आहेत. रोजगार सेवकांनी मग्रारोहयो व्यतिरिक्त इतर शासकीय योजनेच्या कामाकडे लक्ष पुरवून पूर्णत्वास नेने आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाच्या योजना पूर्णत्वास नेल्यास ग्राम रोजगार सेवकांची गाव विकासात महत्त्वाची भूमिका ठरून या निमित्त सामाजिक विकास होण्यास मदत ठरेल. असे गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांनी आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले. आढावा बैठकीचे संचालन व आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गिरेपुंजे यांनी मानले. आढावा बैठकीस तांत्रिक अधिकारी विनाश वालदे, जि.बी. मेश्राम, यशवंत शेंडे, राकेश दाते, महेश बर्वे, सुधाकर कांबळे, आनंद वाघाये, रजनी नांदगावे, किरण बावनकुळे, सर्व संगणक परिचालक, रोजगार सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या