चित्रा न्युज महा
जळगाव - मोजे खडकी सीम येथे वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. चाळीसगाव जिल्हा जळगाव पश्चिमच्यावतीने मौजे खडकी सीम शाखा चे नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विलास आधार चव्हाण, अध्यक्षतेत संपन्न झाला.
शरद धात्रक, हंसराज पगारे,सागर निकम यांच्यासह मौजे खडकी सीम शाखेचे अध्यक्ष अविनाश नेतकर, उपाध्यक्ष विजय चव्हाण, महासचिव समाधान चव्हाण,सह सचिव रतन चव्हाण,धर्मा चव्हाण, कोषाध्यक्ष तुषार मोरे,करण चव्हाण, विशाल चव्हाण, साईनाथ नेतकर, कार्याध्यक्ष अंकित बागुल, प्रसिद्धी प्रमुख अमोल बागुल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भगीनी व बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन माजी सरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केले.


0 टिप्पण्या