चित्रा न्युज महा.
जळगाव - वरखडी व भोकरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण व सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिमच्यावतीने मौजे वरखेडी व मौजे भोकरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिम येथे वंचित बहुजन आघाडी शाखाचे नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रभारी रविकांत वाघ सो.यांचे मार्गदर्शनाखाली झाले. जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, कु.माईसाहेब ( महाराज) राष्ट्रीय समाज प्रबोधनकार होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा तालुकाध्यक्ष मा. विशाल बागुल सो.यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी, आकाश पवार, एजाज पिंजारी, शेख मुस्ताक, सिरीन पठाण यांच्यासह वरखेडी व भोकरी या ठिकाणी फलक अनावरणाचे व सभा पार पाडण्यासाठी सावखेडा येथील राजेंद्र सोनवणे, वरखेडी येथील सुनील भाऊ दांडगे, गटप्रमुख चिराग शहा, वरखेडी शाखाध्यक्ष चंदू भाऊ गोसावी, उपाध्यक्ष राहुल पाटील, सुधाकर पाटील, दिलीप बापू, पवन पाटील, हैदर शहा, मुकेश सावळे, मुराद शहा, आलम शहा, शाहरुख शहा उपस्थित होते.
भोकरी शाखाध्यक्ष रहेमान अंतुले, उपाध्यक्ष लुकमान काकर, जब्बार काकर, हुशेन शहा , रशीद मंगुलाला, करयुप काकर, लुकमान काकर तसेच वरखेडी व भोकरी येथील ग्रामस्थ बंधु भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या